मलकापूर: शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावरून मलकापूर तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आज शनिवारी रस्त्यावर उतरले. त्यात राष्ट्रीय महामार्ग ६ वरील वाघुड फाट्यावर सकाळी रस्तारोको करण्यात आला. पोलिसांनी१२ जणांना स्थानबद्द करून अटक केली.याबाबत माहिती अशी की, शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजाराची मदत मिळावी, बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्थ जाहीर व्हावा, सोयाबीन व कापसाला दुप्पट भाव मिळावे, विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क माफ व्हावे या मागण्यावरून मलकापूर तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते यांनी वाघुड फाट्यावर रस्त्यारोको करून शासनाच्या निषेधार्थ घोषणा दिल्या.मलकापूर शहर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होवून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शशिकांत संबारे, विवेक पाटील, योगेश वानखेडे, सुजित पाटील, विलास इंगळे, अमोल रोकडे, श्रीक्रुष्ण संबारे, ललित डवले,चंदू दांडगे, अमोल घाटे,सुनिल साठे अशा १२ जणांना स्थानबद्द करून अटक केली.(तालुका प्रतिनीधी)
राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको; १२ जण स्थानबद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 12:31 PM