लोकमत न्यूज नेटवर्कधाड : शेतकर्यांना संपूर्ण कर्जमाफीसह राज्यात स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करण्यात यावी, तसेच कृषी क्षेत्रावरच्या समस्या सोडविण्यात याव्या, अशा विविध मागण्यांकरिता धाडमध्ये सोमवारला प्रहार संघटनेच्यावतीने रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले. प्रहारचे जिल्हाध्यक्ष वैभव मोहिते व अपंग क्रांतीचे संजय इंगळे यांच्या नेतृत्वात स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको करण्यात आला.शासनाने शेतकरी कर्जमाफी देताना दुजाभाव करत शेतकर्यांवर अन्याय केला असून, शेतकर्यांना संपूर्ण कर्जमाफीची आवश्यकता आहे. परिणामी, सध्या शेतकरी हैराण असून, राज्यात स्वामिनाथन आयोग लागू करावा व अपंग पुनर्वसन कायदा करण्यात यावा, अशा विविध मागण्यांसाठी प्रहारच्यावतीने आंदोलन करण्यात आले आहे. सोमवारला सकाळी १0 च्या सुमारास स्थानिक शिवाजी महाराज चौकात प्रहारचे ध्वज घेऊन असलेले १२५ च्यावर कार्यकर्त्यांनी सुमारे तासभर रोडवर ठिय्या मांडून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपल्या मागण्या जाहीर करून रास्ता रोको आंदोलन पूर्ण केले.शेतकर्यांना सरकारने संपूर्ण कर्जमाफी देऊन स्वामिनाथन आयोग लागू करण्यात यावा, अशा घोषणा देत तासभर वाहतूक खोळंबून ठेवली. या ठिकाणी ठाणेदार संग्राम पाटील व त्यांच्या सहकार्यांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन स्थानबद्ध केले व त्यांच्यावर कलम ६८ प्रमाणे ताब्यात घेऊन ६९ प्रमाणे मुक्त केले. या आंदोलनात धाड परिसरातून अनेक प्रहारचे कार्यकर्ते हजर होते.
धाड येथे ‘प्रहार’चा ‘रास्ता रोको’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 12:45 AM
धाड : शेतकर्यांना संपूर्ण कर्जमाफीसह राज्यात स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करण्यात यावी, तसेच कृषी क्षेत्रावरच्या समस्या सोडविण्यात याव्या, अशा विविध मागण्यांकरिता धाडमध्ये सोमवारला प्रहार संघटनेच्यावतीने रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले. प्रहारचे जिल्हाध्यक्ष वैभव मोहिते व अपंग क्रांतीचे संजय इंगळे यांच्या नेतृत्वात स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको करण्यात आला आहे.
ठळक मुद्देप्रहारचे जिल्हाध्यक्ष वैभव मोहिते व अपंग क्रांतीचे संजय इंगळे यांच्या नेतृत्वातछत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको करण्यात आला आंदोलनात धाड परिसरातून अनेक प्रहारचे कार्यकर्ते हजर