लोकमत न्यूज नेटवर्कमोताळा : पद्मावत चित्रपटाचे प्रदर्शन थांबविण्याची मागणी राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने बुधवारी मोताळा तहसीलदार यांना निवेदन देऊन करण्यात आली. निवेदनात नमूद आहे, की संजय लीला भन्साली दिग्दर्शित पद्मावत चित्रपटाचे प्रदर्शन येत्या २५ जानेवारी रोजी प्रसारित होणार आहे. या चित्रपटावरून राजपूत समाजाच्या विविध संघटना, समूह, इतिहासकार यांच्या भावना तीव्र झाल्या आहेत. राजपुतांसह देशभक्त नागरिकांमध्ये महाराणी पद्मावती यांच्याबद्दल अत्यंत आदराची भावना आहे. या भावनेला ठेच देण्याचा प्रयत्न भन्सालींनी केल्याची जनभावना आहे. सर्व हिंदू समाज बांधवांच्या भावना दुखावल्या जाऊ नये व दर्शविलेल्या महाराणीबद्दल हिंदू समाजाच्या महिलांमध्ये तसेच समाजात कोणत्याही प्रकारची हानी न होण्याकरिता चित्रपटाचे प्रदर्शन करू नये, जेणेकरून सामाजिक भावना तसेच कोणत्याही प्रकारची हानी होणार नाही. तसे न झाल्यास राष्ट्रीय समाज पक्ष लोकशाही मार्गाने आंदोलन करेल, असा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुका अध्यक्ष संदीप सहावे, युवा तालुका अध्यक्ष नीलेश काटे, मारोती कोल्हे, प्रशांत जवरे, अमित वसतकार, प्रदीप सहावे, राजेंद्र पाचपोळ, गोपाल काटे आदींनी केली आहे.
‘पद्मावत’ चित्रपटाचे प्रदर्शन थांबवा - राष्ट्रीय समाज पक्षाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 12:17 AM
मोताळा : पद्मावत चित्रपटाचे प्रदर्शन थांबविण्याची मागणी राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने बुधवारी मोताळा तहसीलदार यांना निवेदन देऊन करण्यात आली.
ठळक मुद्देमोताळा तहसीलदारांना दिले निवेदन