लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शेतकरी संपाची धग चौथ्या दिवशीही कायम असून, रविवारी बुलडाणा आठवडी बाजार असताना राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या शहर बंदला संमिश्र प्रतिसाद दिला. यावेळी सकाळी भाजीपाला बाजार बंद करण्यात आला. यावेळी शहर बंदचे आवाहन करणार्या राष्ट्रवादीच्या काही पदाधिकार्यांना अटक करण्याची कारवाई करून सोडून देण्यात आले.शेतकर्यांचे कर्ज माफ व्हावे, यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी संपावर गेलेला आहे. परंतु सत्तेवर आल्यावर कर्ज माफ करू, असे म्हणणार्या सरकारने शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी न देता वेळकाढू धोरण अवलंबिले आहे. संघटनेमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. शासनाच्या या कृतीचा निषेध करण्यासाठी तसेच शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या, दुधाला व शेतमालाला भाव मिळावा, याकरिता बुलडाणा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने विधानसभा क्षेत्र अध्यक्ष नरेश शेळके, जि.प. सदस्य डी.एस. लहाने यांच्या नेतृत्वात आठवडी बाजारातील भाजीपाला बाजार बंदचे आवाहन केले होते. सकाळी ५ वाजेपासून कार्यकर्त्यांनी शहराच्या चारही बाजूला नाकाबंदी केली होती. शेतकर्यांनी राष्ट्रवादीच्या आवाहनाला प्रतिसाद देत शहरात माल विक्रीसाठी आणलाच नाही. भाजीपाला हर्रासीसुद्धा झाली नाही. पोलिसांनी दडपशाही करून आंदोलन चिरडण्याचा अटोकाट प्रयत्न केला. सकाळी १0 वाजेपर्यंत भाजीपाला बाजारात एकही दुकान मांडलेले नव्हते. आठवडी बाजारात येणारी आवक २५ टक्केपेक्षाही कमी होती. पोलिसांनी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष डी.एस. लहाने, जिल्हा उपाध्यक्ष नरेश शेळके, सुमित सरदार, संतोष पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना अटक केली. राष्ट्रवादीचे नेते डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी पोलीस स्टेशनला भेट दिल्यानंतर १२ वाजता कार्यकर्त्यांना सोडून देण्यात आले व लाउडस्पिकरद्वारे व्यापार्यांना माल विकण्याचे आवाहन केले. तेव्हा कुठे थोडाफार बाजार सुरू झाला. भाजीपाला बाजार बंद असल्यामुळे अनेक शहरवासीयांना भाजीपाला मिळाला नाही. पोलिसांनी डी.एस. लहाने, नरेश शेळके, सुमित सरदार, संतोष पाटील, अनिल शर्मा, गणेश हुडेकर, सुनील सोनुने, संदीप तायडे, अनिल बावस्कर, शेख सत्तार, रमेश देशमुख, गोविंदा तायडे, दिनकर पांडे, सिध्देश्वर अंभोरे, शिवाजी पडोळ, संजू उबरहंडे, अनिल कोळसे, ज्ञानेश्वर डुकरे, ङ्म्रीराम सुसर, समाधान जाधव, आशिष खरात, शिवाजी गाडेकर, सचिन पाटील, विनोद पैठणे आदी कार्यकर्त्यांना अटक करून स्थानबद्ध करण्यात आले. आंदोलनाच्या यशस्वितेसाठी गणेश हुडेकर, सरोदे मामा, राजू पाटील, सुरेश जाधव, सारंगधर गवळी, अतुल लोखंडे, बबलू कुरेशी, विशाल सोनुने, रामू चौधरी, बाबू राऊत, बबनराव टेकाडे, गजानन टेकाडे, नीलेश गाडेकर, राजू प्राणकर, गोपाल माळोदे, गजू गोरे, राजू बावस्कर, मनीष बोरकर, नागेश मुळे, नीलेश शिंदे, निंबाजी काळवाघे, तुकाराम उबाळे, बळीराम गोरे, गायकवाड, गजानन पवने, किलबले अण्णा, रामेश्वर पवार, ज्ञानेश्वर शेळके, बंडू डुकरे आदी अनेक राष्टवादीच्या मावळय़ांनी भाजीपाला बाजार बंद आंदोलनाला मदत केली. लोणार येथे कडकडीत बंद महाराष्ट्रभर शेतकर्यांना कर्जमाफी व्हावी, यासाठी असंख्य संघटना व सर्व शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. शेतकरी पहिल्यांदाच स्वत:च्या मागण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर लढा देत आहेत; परंतु तुटपुंजी कर्जमाफी नाही, तर शेतकर्यांचा सातबारा कोरा करावा. शेतकर्यांना कर्जमाफी नाही, तर कर्जमुक्ती द्यावी, यासाठी शेतकरी आजही संपावर आहेतच. या दृष्टिकोनातून लोणार येथील शेतकरी यांच्यावतीने व्यापार्यांच्या सहकार्याने ४ जूनला लोणार शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले. संपूर्ण कर्जमाफी व्हावी, स्वामिनाथन आयोगाच्या मागण्या मंजूर कराव्या, शेतमालाच्या खर्चाच्या आधारावर हमीभाव ठरवून देण्यात यावा, अशा प्रमुख मागण्या राज्य सरकारने व केंद्र सरकारने मंजूर कराव्या, यासाठी लोणार येथील संपूर्ण व्यापार्यांनी शेतकर्यांना पाठिंबा देत आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवली आहेत. यामध्ये कडकडीत बंद ठेवत भाजीपाला विक्रेता, दूध विक्रेता, किरकोळ दुकानांसह संपूर्ण लोणार शहरातील व्यापारी बंदमध्ये सहभागी झाले होते. शेगावात शेतक-यांनी केला रास्ता रोको जगाच्या पोशिंद्याला संपूर्ण कर्जमाफी मिळण्यासाठी व स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी लागू होण्यासाठी शेतकरी बांधवांनी पुकारलेल्या संपास पाठिंबा म्हणून रविवारी शेगाव तालुक्यात चिंचोली येथील शेतकर्यांनी चिंचोली फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करीत भाजीपाला, कांदा आणि दूध रस्तावर फेकून निषेध व्यक्त केला. यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनात प्रवीण गीते, गोपाल सदाशिव ढगे, शिवशंकर गीते, गणेश नत्थूजी ढगे, प्रवीण ढगे, पुरुषोत्तम शंकर कोटे, संतोष बळीराम इंगळे, दशरथ भानुदास ढगे, संतोष भिकाजी ढगे, रणजित तोलनकर, विकास ढगे, वैभव रामदास उगले, देवानंद गवई, महेश पहुरकर, ऋषिकेश एकनाथ ढगे, सुनील प्रल्हाद ढगे, अनंता काशीराम ढगे यांच्यासह बहुसंख्य शेतकरी सहभागी झाले होते.जवळपास अर्धा तास हे आंदोलन करण्यात येऊन शासनविरोधात घोषणा देण्यात आल्या. यावेळी आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. महाराष्ट्र बंदला "स्वाभिमानी"चा पाठिंबाशेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले आहे. या महाराष्ट्र बंदमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना सहभागी होणार असून, या आंदोलनात शेतकर्यांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्चिम विदर्भप्रमुख राणा चंद्रशेखर चंदन यांनी केले.
शेगावात रास्ता रोको; जिल्ह्यात बंदला संमिश्र प्रतिसाद
By admin | Published: June 05, 2017 2:35 AM