शेलगाव देशमुख परिसरातील अनेक घरांवरील पडझड झाली. तसेच अनेक नागरिकांच्या घरावरील पत्रे उडून गेली आहेत. वादळी वाऱ्यामुळे नागरिकांची एकच दाणादाण उडाली होती. वादळामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण हाेते. विठ्ठल-रुक्माई विद्यालयातील सर्व खोल्यांवरील तीन पत्रे उडून गेली असून, खोल्यांच्या भिंती कोसळून पडल्या आहेत. या वादळी वाऱ्यामुळे विठ्ठल रुक्माई विद्यालयाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, विद्यार्थ्यांना शाळा सुरू झाल्यावर बसण्याची व्यवस्था करण्याबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला आहे़ शासनाने वेळीच दखल घेऊन विठ्ठल रुक्माई विद्यालयाला आर्थिक मदत करण्याची मागणी होत आहे. शेलगाव देशमुख ते डोणगाव रस्त्यावर मोठमोठाल्या बाभळी हवेमुळे उन्मळून पडल्याने रस्त्यावर जाता येत नव्हते. या मार्गावर काही वेळासाठी वाहतूक विस्कळीत झाली हाेती.
वादळामुळे शाळेचे छत उडाले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 4:25 AM