विवाहितेचा छळ : सासरच्यांविरुद्ध गुन्हा
लाेणार : पत्नीवर संशय घेऊन माहेरवरून ५० हजार रुपये आणण्याचा तगादा लावून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी लाेणार पाेलिसांनी पतीसह सासरच्या आठजणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास लाेणार पाेलीस करीत आहेत. साेमठाणा येथील विवाहितेच्या तक्रारीवरून विजय मच्छिरे याच्यासह आठजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिखली उपजिल्हा रुग्णालय सुरू हाेणार
चिखली : चिखली मतदारसंघात काेराेना रुग्णांची संख्या पाहता उपजिल्हा रुग्णालय तातडीने सुरू करण्याचे आदेश आराेग्य मंत्री राजेश टाेपे यांनी दिले आहेत. त्यामुळे, परिसरातील रुग्णांना दिलासा मिळणार आहे. माजी आमदार राहुल बाेंद्रे यांनी उपजिल्हा रुग्णालय सुरू करण्याची मागणी केली हाेती.
नागरिकांनी काेराेना तपासणी करून घ्यावी
लाेणार : काेराेनाची दुसरी लाट आता ओसरत असल्याचे दिलासादायक चित्र आहे. मात्र, काेराेनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धाेका पाहता, नागरिकांनी गाफील न राहता काेराेनासदृश्य लक्षणे दिसताच आपली काेराेना तपासणी करावी, असे आवाहन आमदार डाॅ. संजय रायमूलकर यांनी केले आहे.
प्राथमिक आराेग्य केंद्र बनले शाेभेचे
सिंदखेडराजा : तालुक्यातील आडगाव राजा प्राथमिक आरोग्य केंद्रावर लसीकरणात भेदभाव सुरू असल्याचे चित्र आहे़ अनेकांना लस मिळत नसल्याने वंचित आहे़ लसीकरणाच्या दिवशी फिजिकल डिस्टन्सिंगचे उल्लंघन हाेत असल्याचे चित्र आहे़
माेताळा येथील रस्त्याची दुरवस्था
माेताळा : येथील आठवडी बाजार ते बसस्थानक या मुख्य मार्गाची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे या मार्गावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावरून पादचाऱ्यांसह वाहनधारकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे.
शेतकऱ्यांच्या बांधावर खते द्या
सुलतानपूर : खरीप हंगामाला सुरुवात होणार असून शेतकरी शेती मशागतीच्या कामास लागला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची कृषी केंद्रांवर गर्दी होऊ नये यासाठी खते व बियाणे ऑनलाइन नोंदणीच्या माध्यमातून बांधावर उपलब्ध करून देण्याची मागणी हेात आहे़
युवक भागवताेय ग्रामस्थांची तहाण
साखरखेर्डा : टँकरद्वारे पाणीपुरवठा करणाऱ्यांनी पाणी विक्रीचा धंदा सुरू केला आहे; तर काही अव्वाच्या सव्वा पैसे घेऊन आपले पोट भरत आहेत. त्यामुळे साखरखेर्डा येथील अमोल ठोकरे नामक लाँड्रीचालक युवक ग्रामस्थांना मोफत पाणीपुरवठा करीत आहे.
११ जणांनी केली काेराेनावर मात
चिखली : किन्होळा येथे कोरोना रुग्णांसाठी सुसज्ज असे आयसोलेशन सेंटर उभारण्यात आले आहे. या केंद्रामध्ये दाखल असलेल्या ११ रुग्णांनी काेराेनावर मात केल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे़ लाेकसहभागातून उभारलेल्या या केंद्रातून अनेकजण बरे झाले आहेत़
नुकसानग्रस्तांना मदत देण्याची मागणी
बुलडाणा : जिल्ह्यात शुक्रवारी व शनिवारी अनेक गावांमध्ये वादळासह पाऊस झाला़ अनेकांच्या घरांवरील टीनपत्रे उडाले आहेत़ तसेच घरांचीही पडझड झाली आहे़ वादळामुळे नुकसान झालेल्यांना तातडीने मदत देण्याची मागणी हाेत आहे़
पीक कर्जवाटपाची गती वाढवा
बुलडाणा : खरीप हंगामात सुरुवात हाेणार आहे़ अवघ्या काही दिवसांवर हंगाम आलेला असताना पीक कर्जवाटपाची संथ आहे़ विविध संकटांनी शेतकरी आधीच त्रस्त झाले आहेत़ त्यामुळे, शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्जाचे वाटप करण्याची मागणी हाेत आहे़
रेमडेसिविरची मागणी घटली
बुलडाणा : जिल्ह्यात काेराेना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी झाल्याने रेमडेसिविरची मागणी घटली आहे़ जिल्ह्यातील विविध रुग्णालयांना जिल्हा प्रशासनामार्फत २९ मे रोजी २११ रेमडेसिविरचे वितरण करण्यात आले आहे़ यापूर्वी ४०० ते ५०० रेमडेसिविर इंजेक्शनची मागणी असायची़
दाेन गटांत हाणामारी, आठजणांवर गुन्हा
धामणगाव बढे : गूळभेली येथे क्षुल्लक कारणावरून दोन गटांत हाणामारी झाल्याची २७ मे रोजी घडली. प्रकरणी परस्परविरोधी तक्रारीवरून धामणगाव बढे पोलिसांनी आठजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.