लोकमत न्यूज नेटवर्कसंग्रामपूर : परिसरातील पाणी टंचाईच्या विरोधात संग्रामपूर तालुक्यातील पळशी झाशी येथील महिलांनी बुधवारी तहसीलदारांच्या कक्षात ठिय्या आंदोलन केले. तब्बल एक तास हे ठिय्या आंदोलन सुरू होते. पळशी झाशी येथील कुंडल कॉलनीमध्ये पाण्याचे कुठलेही स्रोत उपलब्ध नसल्याने महिलांची पाण्यासाठी पायपीट होत आहे. याबाबत वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही कोणतीही उपाययोजना करण्यात येत नाही, तसेच कॉलनीपासून नजीकच असलेल्या १४० गाव पाणी पुरवठा योजनेद्वारेही पाणी पुरवठा करण्यास चालढकल केली जात आहे. त्यामुळे प्रशासनाच्या निषेधार्थ ५०-६० महिलांनी बुधवारी तहसीलदार चव्हाण यांच्या कक्षात ठिय्या आंदोलन केले. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली होती. यावेळीे एपीआय कपिल शेळके व शांताराम दाणे यांनी महिलांची समजूत काढली.
महिलांचा तहसीलदारांच्या कक्षात ठिय्या
By admin | Published: May 18, 2017 12:31 AM