लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात कोरोना संसर्गाची वाढती व्याप्ती पाहता लॉकडाऊन वाढविण्यासोबतच दर शनिवार व रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता कलम १४४ नुसार कडक संचारबंदी लावण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची शनिवारी अंमलबजावणी करण्यात आली. त्याला संपूर्ण जिल्ह्यात प्रतिसाद मिळाला. दरम्यान, संचारबंदीच्या या आदेशाचे उल्लंघन करणाºया जवळपास १०० पेक्षा अधिक व्यक्तींवर पोलिस प्रशासनाने कारवाई केली आहे.एकट्या बुलडाणा शहरात शहर पोलिसांनी यासाठी खास सहा पथके नियुक्त केली होती. या पथकाद्वारे संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांना चांगलाच चोपही देण्यात आला. खामगाव, मलकापूर, नांदुरा, जळगाव जामोद, चिखली, देऊळगाव राजा, मेहकरसह अन्य शहरात तथा ग्रामीण भागात या लॉकडाऊनला चांगला प्रतिसाद मिळाला. हॉटस्पॉट बनलेल्या जिल्ह्यातील काही शहरे व गावातही या संचारबंदीची कडेकोट अंमलबजावणी करण्यात आली. शहरातील महत्त्वाच्या चौकामध्येही पोलिसांनी बंदोबस्त लावला होता. नियम तोडणाºयांवर कारवाईही करण्यात आली.
संचार बंदीचे उल्लंघन करणाºयांवर कारवाईजिल्ह्यातील ३३ पोलिस ठाण्यात शनिवार, रविवारच्या या दोन दिवसांच्या संचारबंदीची अत्यंत काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रत्येकी पाच ते सहा पथके नियुक्त करण्यात आली होती. बुलडाणा शहरातही अशी पथके चौका चौकात कार्यरत होती. संचारबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करणाºया जवळपास ४० जणावर एकट्या बुलडाणा शहरात कारवाई करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली. बुलडाणा शहरात भाजीपाल्यासह सर्वच व्यवसाय बंद होते. एसटी बस सुरू असली तरी तिला प्रवाशीच भेटले नाहीत. त्यामुळे बस गाड्या या बसस्थानकाच उभ्या होत्या.