कडक निर्बंधातून दवाखाने, मेडिकल यांना मुभा देत दूध संकलन केंद्र, दूध डेअरी यांना सकाळी सहा ते सकाळी नऊ वाजेपर्यंत आणि संध्याकाळी सहा ते रात्री आठ वाजेपर्यंत घरपोच दूध वितरण व्यवस्थेसाठी उघडी ठेवण्याची सूट देण्यात आली आहे. तसेच किराणा, भाजीपाला यासारख्या काही दुकानांना ठरविलेल्या वेळेत घरपोच पार्सल सेवा देण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. तसेच अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त फिरण्यास पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर तहसीलदार समाधान सोनवणे, पोलीस निरीक्षक माधवराव गरुड, सहायक पोलीस निरीक्षक राहुल जंजाळ, गटविकास अधिकारी अरुण मोहोड आणि मुख्याधिकारी विभा वऱ्हाडे तसेच बोराखेडी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी एल. टी. उडदेमाळी यांच्या नेतृत्वात ११ मे रोजी सकाळपासूनच तालुका प्रशासनाच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात आली़
चाैघांविरुद्ध गुन्हा दाखल
कडक निर्बंधाच्या काळातही दारू विक्री करणाऱ्या शेषराव श्रावण गायकवाड (रा. शेलापूर खुर्द), सागर शत्रुघ्न पाचपोळ (रा. धरणगाव कुंड), बाळू पाचपोर (रा. मोताळा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला़ तसेच वाघजाळ फाट्यावर टायर्सचे दुकान उघडून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला़