अशाेक इंगळे, साखरखेर्डा : साखरखेर्डा आणि परिसरातील शेकडो शेतकऱ्यांची शेतीची कामे रखडली असून शेतीसाठी मिळणारे बियाणे, खते यासाठी शेतकऱ्यांची परवड होऊ लागली आहे. सात-बारा आणि फेरफार नक्कलही मिळेनाशी झाली आहे. यावर तहसीलदार यांनी तोडगा काढून शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
सिंदखेडराजा तालुक्यात गेल्या एक महिन्यापासून कडक निर्बंध लागू करण्यात आले असून घराबाहेर पडण्याचीसुद्धा मनाई करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी मज्जाव केला जात असून जनावरांना चारापाणी कसा करावा असा प्रश्न उभा ठाकला आहे. शेतकरी थांबला तर अख्ख्य जग थांबेल ही भीती वाटत आहे. मे महिन्यात शेतकरी शेतात जाऊन शेतीची मशागत करतात. काडी कचरा वेचून शेत जमीन पेरणी योग्य करतात. कडक निर्बंधामुळे शेतकऱ्यांना घरीच बसा असा सल्ला दिला जातो. मे महिना अर्धा संपत आला. खते, बियाणे भरण्यासाठी शेतकऱ्यांची तळमळ दिसून येत आहे. कृषी विभाग घरगुती बियाणे वापरावे यासाठी शेतकऱ्यांना ऑनलाईन मार्गदर्शन करीत आहे; परंतु मागील वर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे पीक काळे पडले होते. काही मोजक्याच शेतकऱ्यांजवळ चांगले सोयाबीन असून त्याचा भाव ९ ते १० हजार रुपये क्विंटल असा आहे. ते मिळविण्यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे. ट्रॅक्टरला डिझेल मिळत नाही मोटारसायकलला पेट्रोल मिळत नाही, अशा बिकट परिस्थितीत शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
आर्थिक व्यवहारही ठप्प
बँका बंद आहेत, पैसा मिळत नाही, तहसील कार्यालयात फेरफार नक्कलही मिळेनाशी झाली आहे. सात-बारा मिळविण्यासाठी पटवाऱ्याला शोधावे लागत आहे आणि पाऊस केरळ किनारपट्टीवर येऊन धडकला आहे. अशा बिकट परिस्थितीत शेतकरी असून यावर तोडगा काढून शेतकऱ्यांना शासनाने सवलत द्यावी तरच मृग नक्षत्रात पेरणी करणे सोयीचे होईल.
काेट
काेट
कोरोना संक्रमण वाढत असले तरी शेतकऱ्यांसाठी काहीअंशी निर्बंध शिथिल करण्यात यावेत.
दिलीप आश्रू, इंगळे शेतकरी साखरखेर्डा
देशाचे अर्थकारण हे शेतीवर अवलंबून आहे. शेतकरी थांबला तर अख्ख्य जग थांबेल याची दखल शासनाने घ्यावी.
वामनराव जाधव
शेतकरी संघटनेचे नेते