बुलडाणा : हातऊसने दिलेल्या पैशाच्या मोबदल्यात दिलेला धनादेश बँकेत न वटल्यामुळे धनादेश अनादर प्रकरणी वसंता नथ्थु सुतार यांना न्यायालयाने दोन लाख रूपये नुकसान भरपाई व एक वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. बुलडाणा येथील नरेंद्र मनोहर सोनुने यांनी वसंता नथ्थु सुतार यांना दोन लाख रू पये हातऊसने दिले होते. सदर रक्कम परत करण्याच्या उदे्शाने त्याच्या मोबदल्यात सोनुने यांना सुतार यांनी स्टेट बँकेचा धनादेश दिला होता. सदर धनादेश सोनुने यांनी त्यांच्या खात्यात वटविण्यासाठी टाकला असता खात्यामध्ये पुरेशी रक्कम नसल्यामुळे धनादेश परत आला. म्हणून नाईलाजस्तव सोनुने यांनी बुलडाणा ये थील मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात कलम १३८ नुसार न्याय मिळविण्यासाठी दावा दाखल केला. सदर प्रकरणामध्ये दोन्ही पक्षाकडील पुरावे व युक्तीवाद झाला.दोन्ही पक्षाकडील युक्तीवाद ऐकूण न्यायालयाने सुतार यांना दोन लाख रूपये नुकसान भरपाई व एक वर्षाची शिक्षा ठोठावली. फिर्यादी तर्फे अँड. शरद राखोंडे यांनी काम पाहिले.
धनादेश अनादरप्रकरणी सक्त मजुरी
By admin | Published: November 13, 2014 11:54 PM