लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेच्या वतीने घाटाखालील शेगाव, नांदुरा, मलकापूर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या रास्ता रोको आंदोलनाला शेतकर्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या आंदोलनामुळे काही ठिकाणी चक्काजाम झाला होता. त्यामुळे नागरिकांसह प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाला प्रहारच्यावतीने तीव्र इशारा देण्यात आला.
शेगावात ‘प्रहार’कडून रास्ता रोकोशेगाव: शेतकर्यांच्या प्रश्नांसाठी लढा देणार्या शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीने सोमवारी राज्यभरात चक्काजाम आंदोलन करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार सोमवारी शेगावात प्रहार संघटनेच्या वतीने शहरातील शिवाजी चौक येथील उड्डाणपुलावर रास्ता रोको करण्यात आले. सदर आंदोलन करणार्या ११ कार्यकर्त्यांना पोलिसांनी यावेळी ताब्यात घेतले होते. बच्चू कडू प्रणित प्रहार संघटनेच्या वतीने सोमवारी शेगाव येथील शिवाजी चौक परिसरात असलेल्या अकोट रोडवरील उड्डाणपुलावर ११.३0 वाजताच्या सुमारस प्रहारचे अध्यक्ष नीलेश घोंेगे यांच्या अध्यक्षतेखाली रास्ता रोको करण्यात आला. यावेळी पोलिसांनी ११ जणांना ताब्यात घेतले. राजू मसने, युवराज देशमुख, नितीन टवरे, गजानन बिल्लेवार, किशोर शिंदे, संतोष कान्हेरकर, मंगेश इंगळे, संतोष लाहुडकार, अतुल वाघ, सचिन देशमुख, मोहन देशमुख, ज्ञानदेव कराडे, मतीनखान आणि मुस्ताक खान आदींनी हा रास्ता रोको केला. यावेळी सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या. एपीआय गुरमुले, पो.कॉ. श्याम पाटील व त्यांच्या पथकाने आंदोलकांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई करून सोडून देण्यात आले.
मलकापूर येथे प्रतिसादमलकापूर: शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी मिळालीच पाहिजे या प्रमुख मागणीसह शेतकरी हिताच्या विविध मागण्यांस्तव प्रहार जनशक्ती पक्ष व शेतकरी सुकाणू समितीच्या वतीने १४ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास तहसील चौकात मलकापूर विधानसभा प्रमुख संभाजी शिर्के यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दरम्यान, पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना स्थानबद्ध करून नंतर सोडून दिले.प्रहारचे नेते आ. बच्चू कडू यांच्या आदेशान्वये फसव्या कर्जमाफीविरुद्ध एल्गार पुकारण्यात आला. त्या अनुषंगाने जून २0१७ पर्यंतच्या थकबाकीदार शेतकर्यांना सरसकट कर्जमाफी द्या, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी त्वरित लागू करा, शेतीची सर्व कामे रोजगार हमी योजने अंतर्गत करण्यात यावी. शेतमालावरील निर्यातबंदी उठविण्यात यावी, शेतकरी विधवांना पेन्शन, आत्महत्याग्रस्त पाल्यांना सरकारी नोकरीत आरक्षण द्यावे, हमाल माथाडी, कामगार व अपंगाचे सर्व प्रश्न सोडविण्यात यावे आदी मागण्यांस्तव रास्ता रोको करण्यात आला.या आंदोलनात संभाजी शिर्केसह प्रहारचे तालुकाध्यक्ष पंकज जंगले, शहराध्यक्ष रवींद्र कवळकर, जिल्हा युवा उपाध्यक्ष मंगेश सातव, प्रांजली धोरण, नीलेश फिरके, अजय टप, शालीकराम पाटील, शेषराव सोनोने, नरेश धोरण, अंकुश चौधरी, अर्जुन हिवराळे व इतर पदाधिकारी तथा कार्यकर्ते सहभागी झाले होते.