खामगाव: सरपंच, सदस्य, ग्राम सेवक, ग्राम रोजगार सेवक, ग्राम पंचायत कर्मचारी आणि संगणक परिचालकांच्या विविध मागण्यांसाठी पंचायत राज विकास मंचच्यावतीने सोमवारपासून तीन दिवसांपर्यंत कामबंद आंदोलनाचा सुरूवात करण्यात आली. यामध्ये सोमवारी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात आले.
याबाबत सविस्तर असे की, गत काही वर्षांपासून ग्रामपंचायतीच्या विविध मागण्यांसाठी पंचायत राज विकास मंचच्यावतीने लढा दिल्या जात आहे. सरपंच, सदस्य, ग्रामसेवकांसह ग्रामरोजगार सेवकांच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारपासून तीन दिवस कामबंद आंदोलनास प्रारंभ करण्यात आला असून ग्राम पंचायतीच्या नवीन संशोधीत संरचनेनुसार संगणक परिचालकांना ग्रामपंचायत कर्मचार्यांचा दर्जा दिल्या जावा.
तसेच, दरमहा २० हजार रूपये वेतन देण्यात यावे, संगणक परिचालकांना देण्यात आलेली टारर्गेट प्रणाली रद्द करावी. अभय यावलकर समितिच्या शिफारशीनुसार ग्राम पंचायत कर्मचार्यांना नगर परिषद, नगर पंचायत कर्मचार्याप्रमाणे समान वेतन लागू करावे, यासह आदी मागण्यांसाठी धरणे देण्यात आले.