ऑनलाइन लोकमत
बुलडाणा, दि. 13 - बालाजी मंदिर परिसरात पाईपलानईचा खर्च टाळून कॅनद्वारे पाणी देऊन झाडे जगवण्याचा अनोखा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. बालाजी मंदिर संस्थानने बॉटल, कॅनच्या साहाय्याने झाडांना पाणी देण्याचे काम करत आहेत. या अनोख्या उपक्रमाद्वारे ‘झाडे जगवा, पाणी वाचवा’चा अनोखा संदेश दिला आहे.
शासन स्तरावरून वृक्षारोपणावर लाख रुपये खर्च करण्यात येतो. मात्र, वृक्षसंगोपणाअभावी ती वृक्षलागवड पूर्णत: सुकून जातात. वृक्षांना योग्य वेळी पाणीमिळत नसल्याने वृक्षलागवड केलेल्या ठिकाणी काही दिवसातच सुकलेले रोपटे पाहावयास मिळतात. मात्र या परिस्थतीवर मात करून पाणी वाचवून झाडे जगवण्याचा प्रयोग बुलडाणा येथील बालाजी मंदिर परिसरात पाहावयास मिळतो.
येथील बलाजी मंदिर पसिरात विविध झाडांचे संगोपन करण्यात आले आहे.
सध्या या झाडांना सिंचनाचा खर्च टाळून पाणी देण्याचा अनोखा उपक्रम बालाजी संस्थानने हाती घेतला आहे. वापरलेल्या बॉटल व 5 लिटरच्या कॅनला छिद्र पाडून त्यामध्ये पाणी भरून ती बॉटल किंवा कॅन त्या झाडाच्या मुळाजवळ ठेवण्यात आली. त्यामुळे बॉटलमधील पाणी बॉटलच्या छिद्रातून झाडाच्या मुळाशी सतत पडत राहते. त्यामुळे झाडाच्या मुळाशी ओलावा कायम राहत आहे.
यामध्ये पाणी व सिंचनाचा खर्चही वाचला असून मंदिर परिसरामध्ये अनेक झाडे जगवण्यात आली आहेत.
बालाजी मंदिर संस्थानच्यावतीने बॉटलच्या सहाय्याने झाडांना पाणी देण्याच्या या अनोख्या उपक्रमामुळे ‘झाडे जगवा, पाणी वाचवाचा’ संदेशही जोपासला जात आहे.