बुलडाणा : राज्य परिवहन महामंडळातील कर्मचार्यांना दिली जाणारी मोफत प्रवास सवलत महामंडळाने रद्द केली असून, यापुढे कर्मचार्यांना स्टाफ सांगून एसटीतून फुकटाचा प्रवास करता येणार नाही. तसा निर्णय महामंडळाने घेतला आहे. या संदर्भाचे पत्रक राज्य परिवहन महामंडळाच्या बुलडाणा विभागाला प्राप्त झाले आहे. कर्मचार्यांना त्यांच्या निवासस्थानापासून ५0 कि.मी.पयर्ंतचा प्रवास मोफत करण्यास महामंडळाने मुभा दिली होती. त्यामुळे सदर कर्मचारी वाहकाला कुठे जावयाचे आहे, हे सांगण्याऐवजी केवळ ह्यस्टाफह्ण म्हणायचे अन् राज्यभर कोठेही प्रवास करायचे. महामंडळाने आता ही सवलत मोडित काढण्याचा निर्णय घेतल्याने एस.टी. कर्मचार्यांना यापुढे एसटीचे तिकीट काढूनच प्रवास करावा लागणार आहे. या नव्या निर्णयामुळे कर्मचार्यामध्ये नाराजी व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे नव्यानेच एसटीने लागू केलेल्या प्रत्येक तिकिटावर एक रुपये अधिभाराचेही तिकीट या कर्मचार्यांना काढावे लागणार आहे. या एक रुपयाचे त्यांना वेगळे तिकीटही दिले जाणार आहे. या निर्णयाचा महामंडळाच्या वाहतूक महाव्यवस्थापकांनी नुकताच आदेश जारी केला असून, हा निर्णय राज्य परिवहन महामंडळाच्या मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर व अमरावती विभागाला लागू करण्यात आला आहे. विनातिकीट प्रवास करणे, प्रवासाची विहीत मोफत पास, कार्यालयीन कामानिमित्त देण्यात येणार्या अधिकृत पासेस यासह अन्य बाबींमुळे महामंडळाला उत्पन्नापासून वंचित राहावे लागत आहे. त्यातच कर्मचार्यांचा प्रवाशांशी होणार्या वादामुळे महामंडळाची प्रतिमा मलीन होत आहे. त्यामुळे ६ ते १२ एप्रिल या काळात विशेष मार्ग तपासणी केली जाणार असून, त्यासाठी विशेष पथक तयार केले आहे.
कर्मचा-यांच्या मोफत प्रवासावर ‘एसटी’ची टाच
By admin | Published: April 11, 2016 1:21 AM