खामगाव: प्राप्त ज्ञानाचा लाभ समाजातील दुर्बल घटकाना मिळवून देण्याचा प्रयत्न काही विद्यार्थ्यांनी आपल्या कृतीशिलतेतून दिला. जागतिक स्तनपान सप्ताहात एमजीएम महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध ठिकाणी समुपदेशन केले. काही विद्यार्थ्यांनी दुर्गम भागाला यासाठी प्राधान्य दिले. एम.जी.एम महाविद्यालयातील बाल रोग विभागाच्यावतीने जागतिक स्तनपान सप्ताहानिमीत्त विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. यामधे विद्यार्थ्याचा सहभाग घेण्यात येत असून विद्यार्थी बसस्थानक; रेल्वे स्थानक तसेच गर्दीच्या ठिकाणी स्तनपानाचे महत्त्व पटवून देताहेत. मात्र काही विद्यार्थ्यांनी समाजातील दुर्बल घटक; दुर्गम भागाची समुपदेशन आणि जनजागृतीसाठी निवड केली. यामाध्यमातून गरीब आणि आदिवासी भागातील स्तनदा मातांचे समुपदेशन करण्यात आले. मराठवाड्यासह बुलडाणा जिल्ह्यातील घाटावर आणि घाटाखालील काही तालुक्याची जनजागृतीसाठी निवड केलीय. डॉ. तारू जिंदाल यांच्या व्याख्यानातून प्रेरणाघेत तसेच प्रात्यक्षिक कार्याचा भाग म्हणून अधिष्ठाता डॉ. बोहरा, डॉ. प्रविण सूर्यवंशी यांच्या उपस्तितित तसेच डॉ. अंजली काळे, डॉ. लक्ष्मी राचकोंडा, डॉ. गौरी बापट, डॉ. मांडे, डॉ. मधुरा राज्यम, डॉ प्रणोती जाधव, डॉ. अमृता लोया यांच्या मार्गदर्शनात काही विद्यार्थ्यांनी हा उपक्रम राबविला.
विद्यार्थ्यांची कृतीशिलता; दुर्बलघटकातील महिलांचे समुपदेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 12:20 PM
खामगाव: प्राप्त ज्ञानाचा लाभ समाजातील दुर्बल घटकाना मिळवून देण्याचा प्रयत्न काही विद्यार्थ्यांनी आपल्या कृतीशिलतेतून दिला. जागतिक स्तनपान सप्ताहात एमजीएम महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध ठिकाणी समुपदेशन केले.
ठळक मुद्देजागतिक स्तनपान सप्ताहात एमजीएम महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध ठिकाणी समुपदेशन केले. बाल रोग विभागाच्यावतीने जागतिक स्तनपान सप्ताहानिमीत्त विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत.