शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
2
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
6
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
7
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
8
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
9
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
10
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
11
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
13
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
14
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
15
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
16
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
17
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
18
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
19
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
20
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...

ऑनलाइन अभ्यासात विद्यार्थ्यांपुढे अडचणींचा पाढा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 11:30 AM

काही ठिकाणी विद्यार्थ्यांचा आॅनलाइन टेस्ट पेपर पालक, शिक्षक स्वत: च सोडवत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : लॉकडाउनमुळे शाळा, महाविद्यालयांकडून आॅनलाइन अभ्यासक्रम सुरू आहे. परंतू आॅनलाइन अभ्यासात अडचणींचाच पाढा अधिक वाचल्या जात आहे. अनेक पालकांकडे ‘अ‍ॅन्ड्रॉइड’ मोबाईल नसल्याने व्यत्यय येत आहे. तर काही ठिकाणी विद्यार्थ्यांचा आॅनलाइन टेस्ट पेपर पालक, शिक्षक स्वत: च सोडवत आहेत.सद्या कोव्हिड-१९ (कोरोना) च्या साथीमुळे लॉकडाउनच्या काळात विद्यार्थ्यांचा शालेय अभ्यास थांबू नये, यासाठी आॅनलाईन अभ्यासाचा उपक्रम सर्वत्र सुरू आहे. अगदी जिल्हा परिषद शाळांपासून ते महाविद्यालय, उच्च माहविद्यालय स्तरावरही आॅनलाइन अध्यापन केले जात आहे. शिक्षकांकडून पालकांचे ग्रृप तयार करण्यात आले आहेत. त्यांना अभ्यासक्रमाच्या लिंक टाकून विद्यार्थ्यांचा अभ्यास पूर्ण करून घेतल्या जातो. जिल्ह्या परिषदच्या विद्यार्थ्यांनाही अठवडा भराचा अभ्यास आॅनलाइन पूर्ण करून घेतला जातो. त्यानंतर विद्यार्थ्यांकडून झालेल्या अभ्यासावर आॅनलाईन टेस्ट पेपर सोडविण्यात येते. त्याचा अहवाल शिक्षण विभागाकडके पाठविण्यात येतो. परंतू काही पालकांकडे व्हॉट्स अ‍ॅपची सुविधा आसलेले मोबाईल नसल्याने अडचणी येत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आॅनलाइन अभ्यासाच्या अनेक अडचणी येतात. लींकवर क्लिककेल्यानंतर लिंकर उघडत नाही. इंटरनेटचाही खोडा निर्माण होतो. अशा परिस्थती काही शिक्षक स्वत: च विद्यार्थ्यांचा टेस्ट पेपर सोडवून मोकळे होतात.

आठवडा भराचा अभ्यास आॅनलाइन केल्यानंतर विद्यार्थ्यांना संपूर्ण अभ्यासावर टेस्ट दिल्या जात आहे. ती आॅनलाइन प्रणालीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडूनच सोडवून घेणे आवश्यक आहे. अगदी मोजक्याच पालकांकडे असे मोबाईल नाहीत. त्यांनी दुसऱ्या मुलासोबत बसून तो अभ्यास पूर्ण करावा. एका ठिकाणी दोन मुले अभ्यास करू शकतात.- एजाज खान, शिक्षणाधिकारी, (प्राथमिक), बुलडाणा.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाStudentविद्यार्थी