लोकमत न्यूज नेटवर्कजळगाव जामोद : जळगाव जामोद तालुक्यातील विनाअनुदानीत कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मोर्चा काढून आमच्या शिक्षकांचे वेतन सुरु करावे, अशा मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद व पंचायत समिती जळगाव जामोद चे गटविकास अधिकारी यांना दिले. बी.एस.पटेल कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय पिं पळगाव काळे, ना.मुकुल वासनिक कनिष्ठ महाविद्यालय आडोळ, सेठ तुळशीरामजी ढोकणे कला महाविद्यालय आसलगाव, त्रिमुर्ती कला, वाणिज्य महाविद्यालय आसलगाव, महात्मा फुले कनिष्ठ महाविद्यालय खेर्डा, संत गाडगे महाराज कला महाविद्यालय जामोद, सहकार विद्या मंदिर जळगाव जामोद, अलफरहान उर्दू कनिष्ठ महाविद्यालय जळगाव जामोद येथील विद्यार्थ्यांनी संयुक्तरित्या निवेदन सादर केले. यावेळी ए.बी.धोटे, निवडणूक नायब तहसीलदार यांनी विद्यार्थ्यांकडून मागण्यांचे निवेदन स्वीकारले. त्यानंतर सर्व विद्या र्थ्यांंनी पंचायत समिती जळगाव जामोद येथे जावून गटविकास अधिकारी यांना निवेदन सादर केले.यावेळी विद्यार्थी व विद्यार्थींनी मोठय़ा संख्येने हजर होते.
शिक्षकांच्या वेतनासाठी विद्यार्थ्यांचा मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2017 12:18 AM
जळगाव जामोद : जळगाव जामोद तालुक्यातील विनाअनुदानीत कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मोर्चा काढून आमच्या शिक्षकांचे वेतन सुरु करावे, अशा मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद व पंचायत समिती जळगाव जामोद चे गटविकास अधिकारी यांना दिले.
ठळक मुद्देतालुक्यातील विनाअनुदानीत कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी काढला मोर्चा‘आमच्या शिक्षकांचे वेतन सुरु करावे’, अशी मागणी!उपविभागीय अधिकारी व गटविकास अधिकार्यांना दिले निवेदन