हिवरा आश्रम : विद्यार्थी हे संशोधक व चिकीत्सक विचारसरणीचे असतात. त्यांना शालेय शिक्षण घेत असताना किंवा शिकवितांना विज्ञान हे हसतखेळत व प्रत्यक्ष कृतीतूनच शिकवावे म्हणजे विद्यार्थ्याना समजायला सोपे जाईल. विद्यार्थ्यांना विज्ञान प्रदर्शनीच्या माध्यमातून व्यासपीठ मिळते आणि प्रयोगातूनच तो विज्ञान शिकतो, असे प्रतीपादन मुख्याध्यापक तेजराव ठाकरे यांनी केले. लोणी-लव्हाळा येथील श्री.शिवाजी हायस्कूल मध्ये शालेय स्तरावर आयोजित विज्ञान प्रदर्शनीच्या उद्घाटन प्रसंगी मंगळवारला ते बोलत होते. यावेळी बबन वाघ, संजय कंकाळ, शरदचंद्र काळे, रामेश्वर काळे, संजय वाघ, नितीन पडघान, समाधान सुरडकर, स्नेहा पाटील, प्रदिप धांडे, गुलाबराव चेके, दामोधर गिºहे, केशव कंकाळ, सुहास नाफडे, राजू आखाडे, प्रकाश खराटे, रामेश्वर चव्हाण, रामप्रसाद म्हस्के, दिलीप जाधव आदी उपस्थित होते. या विज्ञान प्रदर्शनामध्ये प्राथमिक व माध्यमिक असे दोन गट पाडण्यात आले होते. याशिवाय स्वयंस्फूर्त भाषण स्पर्धा, निबंध स्पर्धा, प्रश्न मंजुषा, उपकरण निर्मिती अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. एकूण ५५ उपकरणासह शालेय स्तरावरील प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. यावेळी झालेल्या विविध स्पर्धांमध्ये यशस्वी विद्यार्थ्याचे संस्थेचे अध्यक्ष सुदेश लोढे, मुख्याध्यापक व शिक्षकांनी कौतूक केले.
यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव स्वयंस्फूर्त स्पर्धेमध्ये प्राथमिक गटातून रुपाली सवडतकर तर भाषण स्पर्धेमध्ये माध्यमिक गटातून कांचन सवडतकर, निंबध स्पर्धेमध्ये प्राथमिक गटात रुपाली साहेबराव सवडतकर तर माध्यमिक गटातून वैभवी हनुमान जाधव, प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये श्रीकांत गवई, प्रणव काळे, तर उपकरण निर्मिती मध्ये माध्यमिक गटात साहील अंभोरे, प्राथमिक गटातून संतोष जाधव यांनी क्रमांक पटकाविला. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.