लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर : विनाअनुदानित उच्च माध्यमिक शिक्षकांनी विविध मागण्यांसाठी मुंबई येथे आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे १ ऑगस्टपासून उच्च माध्यमिक विद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी ८ ऑगस्ट रोजी मोर्चा काढून तहसीलदार संतोष काकडे यांना निवेदन दिले आहे. गेल्या १७ ते १८ वर्षांपासून कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक विनामोबदला काम करीत आहे. परंतु शासनाचे याकडे नेहमीच दुर्लक्ष होत असल्याने विनाअनुदानित शाळेच्या शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाकडून या शिक्षकांवर अन्याय होत असल्याने शासनाचे लक्ष वेधण्यासाठी १ ऑगस्टपासून उच्च माध्यमिक विद्यालये बंद असून, सदर शिक्षक मुंबई येथे आंदोलन करीत आहेत. परंतु शिक्षकांच्या रास्त आंदोलनाचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत असल्याने ८ ऑगस्ट रोजी शहरातील मुला-मुलींना मोर्चा काढून शिक्षकांच्या मागण्यासाठी पाठिंबा देऊन आमचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळावे, असे निवेदन तहसीलदार संतोष काकडे यांना दिले.
शिक्षकांच्या आंदोलनामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 12:47 AM
मेहकर : विनाअनुदानित उच्च माध्यमिक शिक्षकांनी विविध मागण्यांसाठी मुंबई येथे आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे १ ऑगस्टपासून उच्च माध्यमिक विद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी ८ ऑगस्ट रोजी मोर्चा काढून तहसीलदार संतोष काकडे यांना निवेदन दिले आहे.
ठळक मुद्दे१ ऑगस्टपासून उच्च माध्यमिक विद्यालये बंद विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसानविद्यार्थ्यांनी मोर्चा काढून तहसीलदार काकडे यांना दिले निवेदन