मेहकर (बुलडाणा) : स्वच्छतेला आरोग्य व प्रसन्नतेची गुरूकिल्ली मानली जाते. स्वच्छतेचे महत्त्व तालुक्यातील मोळा जि.प.कें.म. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांंनी जाणले असून, ते ह्यमाझी शाळा, स्वच्छ शाळाह्ण, असा उपक्रम बालक दिनापासून राबवित आहेत. स्वच्छतेच्या या उपक्रमाला शाळेतील सर्वच विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसत आहे. मोळा येथील जि.प.कें.म. प्राथमिक शाळेत ह्यमाझी शाळा, स्वच्छ शाळाह्ण, हा उ पक्रम राबवून बालकदिन साजरा करण्यात आला. दरम्यान संपूर्ण विद्यार्थ्यांनी स्वच्छ शाळा दिन साजरा केला. ह्यमाझी शाळा, स्वच्छ शाळाह्ण या उपक्रमांतर्गत सकाळी १0 वाजता शाळेच्या स्वच्छतेला सुरुवात करण्यात आली. शाळेच्या सर्व वर्गखोल्या, क्रीडांगण, शौचालय येथे स्वच्छता करण्यात आली. शालेय इमारत, बगीचा व परिसर स्वच्छ व सुंदर करण्यात आला. येथील विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटले असून, त्यांनी उत्साहाने या उपक्रमात सहभाग घेतला होता.
मोळा येथील विद्यार्थ्यांनी जाणले स्वच्छतेचे महत्त्व
By admin | Published: November 16, 2014 12:03 AM