लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : स्थानिक सहकार विद्या मंदिर येथील विद्यार्थी व शिक्षिका अमेरिका येथे अभ्यास दौऱ्याकरिता जात आहेत. १० दिवसांच्या या दौऱ्यादरम्यान ते अमेरिकेतील जगप्रसिद्ध नासा संस्था व विविध ठिकाणांना भेटी देणार आहेत.सदर अभ्यास दौरा हा १७ मे पासून सुरू होत आहे. यामध्ये न्यूयार्क शहर भेटीदरम्यान स्टॅच्यु आॅफ लिबर्टी, एप्मरर बिल्डिंग, मॅनहॅटन, ग्राउंड झिरो, टाइम्स स्क्वेअर, सेन्ट्रल पार्क, युनायटेड नेशन्स, ट्रम्प टॉवर, ऐलिस आर्येलंड, जगप्रसिद्ध नायगारा धबधबा, अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन यामध्ये जैफरसन मेमोरियल, अमेरिकन राष्ट्रपतीचे निवासस्थान व्हाइट हाऊस, सुप्रिम कोर्ट, ग्रॅन्ट मेमोरियल, एफबीआय बिल्डिंगला भेट देतील. पुढे विद्यार्थी केनेडी स्पेस सेंटरला भेट देतील. यानंतर विद्यार्थी डिस्रे मॅजिक किंगडम येथे भेट देऊन विविध प्रेक्षणीय स्थळांना भेट देतील. अभ्यास दौऱ्यात निधी खानझोडे, आचल सुराणा, सार्थक बोथरा, हर्षल चेके, वृषाली राऊत, सिद्ध कोठारी, सम्यक कोठारी आहेत. तसेच अभ्यास दौऱ्याकरिता शाळेच्या हेडमिस्ट्रेट मोहिनी ससेदेखील सहभागी आहेत. अभ्यास दौऱ्याला जाणाऱ्यांना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक, अध्यक्ष कोमल झंवर व मुख्य कार्यकारी संचालक सुकेश झंवर या कर्मचारी वर्गाने शुभेच्छा दिल्या.
सहकार विद्या मंदिरचे विद्यार्थी नासा सफरीवर
By admin | Published: May 18, 2017 12:07 AM