खामगाव : गेल्या १0 ते १२ दिवसांपासून गावात एस.टी. बस येत नसल्याने त्रस्त झालेल्या दिवठाणा येथील ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांनी आज ४ सप्टेंबर रोजी सकाळी १0 वाजता गावात बस येताच रोखून धरली.तालुक्यातील दिवठाणा येथे खामगाव आगाराची एस.टी. बस विद्यार्थी तसेच प्रवाशांना ये-जा करते; मात्र गेल्या १0 ते १२ दिवसांपासून गावात एस.टी. येत नसल्याने सरपंच व ग्रामस्थांनी खामगाव आगाराला बस सुरु करण्याबाबत निवेदन दिले होते. दिवठाणा येथील बहुतांश विद्यार्थी वर्णा, रोहणा मार्गे खामगावला शिक्षणासाठी येतात; मात्र एस.टी. बंद असल्याने विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागत होता. अखेर आज सकाळी १0 वाजता बस गावात पोहोचताच खामगावला जाण्यासाठी ग्रामस्थ व विद्यार्थ्यांनी बस रोखून धरली. जवळजवळ अर्धा तास विद्यार्थी बसपुढे ठाण मांडून बसले होते. अध्र्या तासानंतर विद्यार्थ्यांना समजावल्यानंतर ही एस.टी.बस खामगावला परत रवाना झाली.
विद्यार्थ्यांनी बस रोखली
By admin | Published: September 05, 2014 12:30 AM