लोकमत न्यूज नेटवर्कनांदुरा : नांदुरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने शेतकरी कुटुंबातील मुलींसाठी शेतकरी कन्या अभ्यासिकेचे शनिवारी उद्घाटन करण्यात आले.नांदुरा बाजार समितीने सर्वप्रथम शेतकर्यांच्या मुलांसाठी शे तकरी पुत्र अभ्यासिका सुरू केली होती. याची दखल राज्या तील इतरही बाजार समित्यांनी घेत अशा अभ्यासिका सुरू केल्या आहेत. शेतकर्यांच्या मुलांमध्ये बुद्धिमत्ता असूनही आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना मोठय़ा शहरांमध्ये स्पर्धा परीक्षांचे क्लासेस लावणे परवडत नसल्याने त्यांच्याकरिता नांदुरा बाजार समितीने जुन्या मार्केटच्या बिल्डिंगमध्ये रेल्वे स्टेशन चौकात अभ्यासिका सुरू केली होती. आता याहीपुढे जात शेतकरी कुटुंबातील मुलींसाठी स्वतंत्र व्यवस्था करीत शेतकरी कन्या अभ्यासिका सुरू करण्यात आली. या अभ्यासिकेचे उद्घाटन नवनिर्वाचित सभापती बलदेवराव चोपडे व उपसभापती संजय फणसे यांच्या हस्ते करण्यात आले. सदर शेतकरी कन्या अभ्यासिकेच्या उद्घाटनप्रसंगी या शेतकरी पुत्र व शेतकरी कन्या अभ्यासिकेच्या संकल्पनेचे जनक बाजार समिती संचालक राजेश गावंडे यांच्यासह सर्वश्री संचालक संतोष मुंढे, राजेश डागा, गणेश ताठे, कैलास डांगे, गोविंदा पाटील उपस्थित हो ते. उद्घाटनाप्रसंगी शेतकरी पुत्र अमोल ठाकरे व शेतकरी कन्या कविता शेगोकार यांनी शेतकर्यांच्या मुलांसाठी बाजार समिती करीत असलेल्या कार्याचे कौतुक आपल्या मनोग तामधून केले. कार्यक्रमाचे संचालन हेमंत महाजन यांनी केले, तर अमोल अवचार यांनी आभार मानले.
शेतकरी कुटुंबातील मुलींसाठी अभ्यासिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 1:12 AM
नांदुरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने शेतकरी कुटुंबातील मुलींसाठी शेतकरी कन्या अभ्यासिकेचे शनिवारी उद्घाटन करण्यात आले. नांदुरा बाजार समितीने सर्वप्रथम शेतकर्यांच्या मुलांसाठी शे तकरी पुत्र अभ्यासिका सुरू केली होती. याची दखल राज्या तील इतरही बाजार समित्यांनी घेत अशा अभ्यासिका सुरू केल्या आहेत.
ठळक मुद्देस्पर्धा परीक्षांची तयारी करता येणार नांदुरा कृषी उत्पन्न बाजार समितीचा उपक्रम