हिवरा आश्रम : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धां परिक्षांसाठी मार्गदर्शन मिळत नाही. स्पर्धा परिक्षासाठी प्रयत्नाची पराकाष्टा करा, असे प्रतिपादन मेहकरचे उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैंजने यांनी केले. येथील शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद आश्रम द्वारा संचालित विवेकानंद कृषी व कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या वार्षीक स्नेहसंमलेन शीवार २०१७-१८ च्या उद्घाटन प्रसंगी शुक्रवारला ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरूवात स्वामी विवेकानंद व शुकदास महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते तर प्रमुख पाहूणे म्हणून सचिव संतोष गोरे, सहसचिव आत्मानंद थोरहाते, प्राचार्य डॉ.सुभाष कालवे, प्राचार्य अनुप शेवाळे, विश्वस्त नारायण भारस्कर, पुरूषोत्तम आकोटकर, अशोक गिºहे, जेष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष भिमराव शेळके, जिमखाना प्रमुख प्रा.शिवशंकर काकडे, प्रा.निलेश शिंदे आदींची उपस्थिती होती. पुढे बोलतांना वैंजने म्हणाले की, प्रत्येक यशस्वी माणसाचे यश हे अपयशाच्या अनेक पायºयावर उभे असते. स्पर्धा परिक्षेत येणाºया अनेक अडचणी, संकट व अपयश यांच्याशी सामना करण्यातच खरा पुरूषार्थ व पराक्रम आहे. जो विद्यार्थी संकटाचे संधीत रूपातंर करू शकतो, तोच स्पर्धा परिक्षेत यशस्वी होवू शकतो. स्पर्धा परीक्षा जिंकण्यासाठी चिकाटी, जिद्द, अभ्यासाचे नियोजन एकाग्रता, सातत्य, मेहनत आणि संयम हे गुण आवश्यक आहे. कार्यक्रमाचे प्रास्तावीक प्राचार्य डॉ.सुभाष कालवे यांनी तर संचालन साहिल शेळके व स्नेहल पवार यांनी केले. आभार डिगांबर भालेकर व शितल वानखेडे यांनी मानले.