- अनिल गवई
खामगाव : बनावट बांधकाम परवानगीचा प्रकार पालिकेतील खामगाव पालिकेतील बांधकाम विभागात ऐरणीवर आला आहे. त्यामुळे बांधकाम विभागात एकच खळबळ उडाल्याचे समजते. दरम्यान, बांधकाम विभागातील फाईल गहाळ आणि बनावट पावती प्रकरणी संबंधितांची चांगलीच कानउघडणी करण्यात आली. यासंदर्भात पोलिसात तक्रार देण्याचे निर्देश मुख्याधिकाºयांनी संबंधितांना दिल्याची खात्रीलायक माहिती आहे.
जिल्ह्यातील सर्वात मोठी नगर पालिका असलेल्या खामगाव पालिकेतील विविध घोळाची प्रकरणं सद्यस्थितीत जिल्हास्तरावर गाजत आहेत. बनावट पावत्यांच्या आधारे सहा नळ जोडणीचे प्रकरण निस्तरत नाही, तोच गेल्याच आठवड्यात कर विभागातील बनावट पावतीचे प्रकरण उघड झाले. शेगाव रोडवरील ग्रामीण भागाच्या हद्दीत असलेले हॉटेल पॅराडाईज नगर पालिका हद्दीत दाखवून कर विभागात बनावट पावती तयार करण्यात आली. पालिकेतील कर आकारणी कंत्राटदाराचा सर्वेअर असलेल्या सतीश बोचरे आणि कामाला असलेल्या ऋषी पवार यांनी हा गंभीर प्रकार केल्याचे उघडकीस आले. १८ ते २१ सप्टेंबरच्या कालावधीत हा प्रकार करण्यात आला. यासाठी हॉटेल पॅराडाईजच्या मालमत्तेच्या नोंदीसाठी ३४ हजार १०० रुपयांचा भरणा करण्यात आला. हा धक्कादायक प्रकार उजेडात आल्यानंतर मुख्याधिकाºयांच्या निर्देशावरून कर विभागातील अधिकारी आणि कर्मचाºयांनी शहरातील सर्वच मालमत्तांची संगणकीकृत तपासणी केली. कर विभागातील वरिष्ठ लिपिकांमार्फत सलग दोन दिवस कर पावत्यांची झाडाझडती घेण्यात आली. खात्रीलायक माहितीनुसार यामध्ये हॉटेल पॅराडाईजसोबतच आणखी काही बनावट पावत्या तर तयार झाल्या नाहीत ना? त्या अनुषंगाने दस्तवेजांची तपासणी करण्यात आली. यामध्ये काही कच्चे दुवे हाती लागल्याचे समजते. दरम्यान, याप्रकरणी बांधकाम विभागातील वरिष्ठ अधिकाºयांशी संपर्क साधला असता, त्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला.
चौकट...
पालिकेतील दोघे रडारवर!
कर विभागातील बनावट पावती प्रकरण सहा. कर अधीक्षकांच्या अंगावर शेकल्या जाणाºयाची शक्यता असतानाच, बांधकाम परवानगीसाठी आलेल्या अनेक फाईल गहाळ आहेत. त्यामुळे सहा. नाका मोहरील असलेला एक कर्मचारीही मुख्याधिकाºयांच्या रडारवर सापडल्याची चर्चा आहे. बांधकाम विभागात बांधकाम परवानगीसाठी आलेल्या अनेक फाईल गहाळ आहेत. यातील एक फाईल काही केल्या सापडत नाही. त्यामुळे मुख्याधिकाºयांनी अखेर याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्याचे निर्देश दिलेत. सोबतच इतरही गहाळ फाईल शोधण्यासाठी संबंधितांची कानउघडणी केली.