नागपूर : बुलडाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या पाण्याचा रंग कोणत्या कारणामुळे बदलला, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी राज्य सरकारला केली व यावर २९ जूनपर्यंत उत्तर सादर करण्याचा आदेश दिला. प्रकरणावर न्यायमूर्तिद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली.लोणार सरोवराचे संवर्धन व विकासाकरिता अॅड. कीर्ती निपाणकर, गोविंद खेकाळे व सुधाकर बुगदाने यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. काही दिवसांपूर्वी लोणार सरोवरातील पाण्याचा रंग अचानक बदलून लालसर गुलाबी झाला. एक आठवड्यात योग्य तो निर्णय घेऊन अहवाल सादर करावा. लोणारचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प बंद आहे. नीरीची मदत घेऊन तातडीने प्रकल्प कार्यान्वित करावा, असे निर्देश न्यायालयाने दिले.
लोणार सरोवरातील पाण्याचा रंग का बदलला?; हायकोर्टाची विचारणा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 3:54 AM