मेहकर : मराठा, मुस्लीम, धनगर व लिंगायत समाजाला शासनाने लवकरात लवकर आरक्षण द्यावे, या मागणी करिता माजी राज्यमंत्री व बुलडाणा जिल्हा शासकीय नळ पाणीपुरवठा योजना भष्टाचार निर्मुलन समितीचे अध्यक्ष सुबोध सावजी यांचे नेतृत्वात रक्ताने १० हजार सह्याचे निवेदन मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांना पाठविण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील मराठा, मुस्लीम, धनगर व लिंगायत या समाजाला आरक्षण मिळावे यासाठी समाज बांधव गेल्या अनेक दिवसापासून विविध मार्गाने आंदोलन करीत आहेत. परंतु या समाजाला आरक्षण देण्यास शासनाकडून विलंब होत आहे. त्यामुळे मराठा, मुस्लीम, धनगर व लिंगायत समाजाला आरक्षण मिळावे यासाठी माजी राज्यमंत्री व बुलडाणा जिल्हा शासकीय नळ पाणीपुरवठा योजना भष्टाचार निर्मुलन समितीचे अध्यक्ष सुबोध सावजी हे ७ आॅगस्ट रोजी दुपारी १ वाजता मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचे नावाने जिल्हाधिकारी बुलडाणा यांना रक्ताने केलेल्या दहा हजार सह्याचे निवेदन देणार आहेत. यासाठी १ आॅगस्ट रोजी डोणगाव येथे बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. बैठकीचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री व बुलडाणा जिल्हा शासकीय नळ पाणीपुरवठा योजना भष्ठाचार निर्मुलन समितीचे अध्यक्ष सुबोध सावजी हे होते. यावेळी दामु आण्णा ढोणे, शैलेश सावजी, कडूबा देशमुख, विनायकराव सुर्वे, सिताराम शिंदे, माणिकराव नवघरे, लक्ष्मणराव पादर,े रमेशचंद्र बियाणी, राजू मिटकरी, दत्ता शिंदे, दिलीप सावजी, प्रविण काठोळे, दिपक जोहरले, खुशालराव गायकवाड, चंद विनायक, रहीम पठाण, रम्मूभाई मेकॅनिक, वामनराव देशमुख, अबरार मल्ली, रामभाऊ नालिंदे, संतोषराव सुर्वे, शमी भाई, विनोद घाबे, आकाश जावळे, रमेश परमाळे, गिरीधर देशमुख, डॉ श्रीराम मेहेत्रे, बळीराम पांडव, नामदेवराव काळे, गफ्फार शहा, हमीद सावकार, रमेश काळ,े अंबादास काठोळ,े महादेव गायकवाडसह कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
मराठा, मुस्लीम, धनगर, लिंंगायत समाजाच्या आरक्षणासाठी सुबोध सावजी सरसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 1:00 PM
भष्टाचार निर्मुलन समितीचे अध्यक्ष सुबोध सावजी यांचे नेतृत्वात रक्ताने १० हजार सह्याचे निवेदन मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांना पाठविण्यात येणार आहे.
ठळक मुद्दे ७ आॅगस्ट रोजी दुपारी १ वाजता मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचे नावाने जिल्हाधिकारी बुलडाणा यांना रक्ताने केलेल्या दहा हजार सह्याचे निवेदन देणार आहेत. आरक्षण मिळावे यासाठी समाज बांधव गेल्या अनेक दिवसापासून विविध मार्गाने आंदोलन करीत आहेत. परंतु या समाजाला आरक्षण देण्यास शासनाकडून विलंब होत आहे.