खामगाव : खातेदारांचा विश्वास जिंकुन बँक ऑफ महाराष्ट्र शाखा खामगावच्या घारोड येथील ग्राहक सेवा केंद्र चालक भागवत आत्माराम साबळे याने खातेदारांना लाखो रूपयांनी गंडा घातल्याचा प्रकार १६ ऑक्टोबर रोजी उघडकीस आला आहे.संजय गांधी निराधार योजना व पंचायत समिती अंतर्गत विशेष घटक योजना तसेच मध्यम मुदती, अल्पमुदती व दीर्घ मुदती असे लोखंडा, पाळा, घारोड, अकोली येथील खातेदारांचे खामगाव येथील बँक ऑफ महाराष्ट्रामधील दैनंदिन व्यवहाराचे खाते आहेत. मात्र खामगाव शहर हे उपरोक्त सर्व गावांपासून लांब अंतरावर असल्याने नागरिकांना दररोज पैशांचे व्यवहार करण्यास अडचण निर्माण होत होती. म्हणून त्यांनी बँकेअंतर्गत घारोड येथील ग्राहक सेवा केंद्राचा संचालक भागवत आत्माराम साबळे यांच्याकडे खातेदारांचे व्यवहार सुरू केले होते. तो दररोज नागरिकांना पैशांची देवाण घेवाण करून त्यांना घर बसल्या विड्रॉल ने-आण करत होता त्यामुळे नागरिकांचा त्यांच्यावर विश्वास बसला. तालुक्यामध्ये ग्रामीण भागातील अनेकगावे विविध बँकेकडे दत्तक आहेत. त्यापैकी बँक ऑफ महाराष्ट्रकडे असलेल्या गावांमधील अनेक खातेदार हे साबळे याच्याकडे व्यवहार करत होते. मात्र त्याने नागरिकांच्या खा त्यामधून लाखो रूपयांची हेराफेरी करून सदर रक्कम आपल्या खात्यात व नातेवाईकांच्या खात्यात वळती केली.लोखंडा येथील सौ.मिरा पुंडे यांच्या खात्यातून २२ हजार, ज्ञानदेव पातोडे अकोली यांच्या खात्यातून २३८८८ रूपये, जगदेव गव्हांदे रा. लोखंडा ८0 हजार रूपये व राजेंद्र विनायकराव देशमुख यांच्या खात्यातून २ लाख ९७ हजार रू पयांचा उपहार करून सदर रकमा ह्या वेगवेगळ्या खात्यात वळविल्या. दिवाळी असल्यामुळे खातेदार हे खामगाव येथे खरेदीसाठी बाजारात आले होते. त्यांच्याकडे पैशांची कमतरता असल्यामुळे आपले खातेचे पासबुक घेवून बँक ऑफ महाराष्ट्र शाखा खामगावमध्ये १५ व १६ ऑक्टोबर रोजी गेले असता त्यांना बँक कर्मचार्याने तुमच्या खात्यामध्ये पैसेच नाहीत तुम्ही रकमा काढल्या आहेत, असे सांगितले. तेव्हा आपली फसवणूक झाल्याचे खातेदारांच्या लक्षात आले. त्यामुळे या केंद्राअंतर्गत सर्व खातेदारांनी बँकेत येवून चौकशी केली असता त्यांच्याही खात्यातून रकमा इतरत्र वळविल्याचे उघडकीस आले तर खातेदारांनी बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखा व्यवस्थापकास सदर प्रकरणाबाबत विचारणा केली असता शाखाधिकारी यांनी सर्वांचे पासबुक घेवून झालेल्या अपहाराची चौकशी सुरू केली आहे. यासंदर्भात बँकेच्या शाखा व्यवस्थापकांशी संपर्क साधला अस ता त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केल्याचे मान्य केले.
२00 च्या वर खातेदारांना फसविले!सदरच्या खातेदारांची संख्या २00 च्या आसपास असून याबाबत बँक प्रशासनाने यांसदर्भात शहर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. दरम्यान या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून ग्राहक सेवा केंद्र संचालक फरार असल्याचे समजते.