हरियाणा, पंजाब, महाराष्ट्र, व उत्तर प्रदेश या राज्यांतील ३९ मुलींच्या संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. यामध्ये अमडापूरच्या मुलींनी मैदानावर उत्कृष्ट कामगिरी करत मैदान गाजवले. तन्वी शरद खाजभागे ही मॅन ऑफ दी सिरिज ठरली. गौरी म्हस्के हिला उत्कृष्ट नेटमन म्हणून गौरविण्यात आले आहे. हरियाणाच्या मुलीच्या संघाला पराभूत करून फायनल मॅच जिंकली व अमडापूरचे नाव त्या चषकावर कोरत बाजी मारली. विदर्भासह अमडापूरचे नावलौकिक वाढविले. या यशाबदल शुटिंग बाॅल असोसिएशन विदर्भ सचिव शकिल काझी, कोषाध्यक्ष आप्पा राजे, प्रशिक्षक शरद खाजभागे, संघातील तन्वी शरद खाजभागे, नीलाक्षी अनिल पुरंदरे, नेहा अरूण काळे, मेघा सुकदेव ईरतकर, गौरी गजानन म्हस्के, ऋतुजा भारत खाजभागे, दीक्षा गणेश जाधव, जयश्री कैलास नेमाडे यांचे विविध स्तरावरून कौतुक होत आहे. यावेळी या संघाला ऑल इंडिया शुटिंग बाॅल फेडरेशन अध्यक्ष अंजुल अग्रवाल, महासचिव रवींद्र तोमर विदर्भ सचिव वकिल काझी, कोषाध्यक्ष आप्पा राजे देशमुख व या मुलींसाठी विषेध लक्ष देऊन कामगिरी करणारे प्रशिक्षक शरद खाजभागे यांच्या हस्ते चषक देण्यात आले.
राष्ट्रीय शुटिंग बाॅल चॅम्पियनशिपमध्ये अमडापूरच्या मुलींचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 4:35 AM