बुलडाणा : भाेकरदन जि़ जालना येथील एका १४ वर्षीय बालिकेचा सागवन बुलडाणा येथे हाेणारा विवाह चाईल्ड लाईन, बाल संरक्षण कक्षाच्या वतीने संयुक्तपणे कारवाई करून राेखला़ या प्रकरणी पाच जणांविरुद्ध विविध कलमान्व्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़. तसेच जळगाव जामाेद तालुक्यातील माेहिदेपुर येथे हाेत असलेला १७ वर्षीय मुलीचा विवाह थांबवण्यात प्रशासनाला यश आले आहे़.भोकरदन जिल्हा जालना येथील एक १४ वर्षीय बालिकेचा विवाह सागवन येथील युवकाबराेबर हाेणार हाेता़. बालिका ही जालना जिल्ह्याची रहिवाशी असून अवघ्या१४ व्या वर्षी तिच्या आई वडिलांना वराकडील मंडळींनी पैसे देउन हा विवाह आयाेजित केला हाेता़. बाल विवाह संपन्न होत असल्याची माहिती चाइल्ड लाईन व जिल्हा बाल संरक्षण कक्षाला मिळाली होती. माहितीचे गांभीर्य लक्षात घेता जिल्हा बाल संरक्षण कक्षा मार्फत सर्व बाल संरक्षण यंत्रणा यांना सूचित करण्यात आले होते. पोलिस अधीक्षक कार्यालयामार्फत महिला बाल सहाय्यता कक्ष प्रमुख एपीआय अलका निकाळजे, बुलडाणा शहर पोलिस स्टेशन पोलिस निरीक्षक सोळंके यांच्या मार्गदर्शनात पीएसआय विनायक रामोड, एएसआय राजेश गणेशे,एनसीपी भगवान शेवाळे, दीपमाला उमरकर तसेच जिल्हा बाल संरक्षण अधिकारी दिवेश मराठे यांच्या मार्गदर्शनात संरक्षण अधिकारी सागर राऊत, प्रदीप सपकाळ व चाइल्ड लाईन समन्वयक शोएब शेख, बाल स्नेही कार्यकर्ते अमित देशमाने इत्यादींनी रात्री सागवान परिसरात बालिकेचा शोध घेततला़ मुलीला लग्नाची हळद लागलेली असताना पोलिसांनी बालिकेला ताब्यात घेत बाल विवाहाचा कट उधळून लावला़ तिच्या सुरक्षेसाठी तिला सखी वन स्टॉप सेंटरला रात्रीच दाखल करण्यात आले. सकाळी बालिकेला बाल कल्याण समिती बुलडाणा यांच्या समक्ष हजर करण्यात आले़.
जळगाव जामाेद तालुक्यातही कारवाईजळगाव जामोद तालुक्यातील मोहिदेपुर येथे देखील पोलिस प्रशासनाच्या वतीने १७ वर्षीय बालिकेचा विवाह आई वडील व नातेवाईक यांना समज देऊन थांबविण्यात आला. माेहीदेपूर गावात एकाच मंडपात ०३ भावंडांचे लग्न नियोजित असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या तीन भावंडा पैकी एका बालिकेचे वय विवाह योग्य नसल्याचे पोलिस विभागाला माहिती मिळाली होती़ माहितीची दाखल घेत गाव स्तरावर बैठक घेत गावातील सरपंच, पोलिस पाटील, ग्रामसेवक तथा बाल विवाह प्रतिबंध अधिकारी व ग्राम बाल संरक्षण समितीच्या उपस्थिती पालकांना बाल विवाह करणे कायद्याने गुन्हा असल्याचे सांगत पोलिस यंत्रणे मार्फत सदर बाल विवाह थांबविण्यात आला. विशेष म्हणजे या सर्व कार्यवाहीची धुरा पोलिस प्रशासनाने सांभाळली होती.