बुलडाणा : दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील किक बॉक्सींग स्पर्धेत सैनिकी शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून नेत्रदिपक कामगिरी करीत यश संपादन केले असून त्या विद्यार्थ्यांची आयर्लंड येथे होणा ऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. राष्ट्रीय किक बॉक्सींग स्पर्धा तालकटोरा स्टेडियम दिल्ली येथे १६ ते २० जानेवारी या कालावधीमध्ये पार पडल्या. यामध्ये स्थानिक राजीव गांधी सैनिकी शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून उत्कृष्ट कामगिरी करत यश संपादन करून रजत व कांस्य पदके पटकावली. यामध्ये १५ वर्षाखालील वयोगटामध्ये संकेत रामदास सरोदे याने रजत पदक पटकावले, १८ वर्षाखालील वयोगटामध्ये शुभम शिवदास दोडे याने कांस्य पदक तसेच २१ वर्षाखालील वयोगटात सुमित रामचंद्र खरे याने सुध्दा कांस्यपदक पटकावले. या तिनही विद्यार्थ्यांची निवड आयर्लंड येथे होणाºया आंतरराराष्ट्रीय किक बॉक्सींग स्पर्धेसाठी झाली आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशिक्षक सिध्दार्थ सरकटे, सहाय्यक शिक्षक प्रशांतकुमार डोमळे, शाळेचे अध्यक्ष विश्वनाथ माळी, कोषाध्यक्षा विद्या माळी, प्रशासकीय अधिकारी अशोक राऊत, मुख्याध्यापक रविंद्र पडघान, उपमुख्याध्यापक शैलेश वारे, क्रीडा समिती अध्यक्ष प्रकाश खेत्रे आदींनी मार्गदर्शन केले.
दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय किक बॉक्सींग स्पर्धेत बुलडाण्याच्या राजीव गांधी सैनिकी शाळेचे यश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 14:27 IST
बुलडाणा : दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील किक बॉक्सींग स्पर्धेत सैनिकी शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून नेत्रदिपक कामगिरी करीत यश संपादन केले असून त्या विद्यार्थ्यांची आयर्लंड येथे होणा ऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय किक बॉक्सींग स्पर्धेत बुलडाण्याच्या राजीव गांधी सैनिकी शाळेचे यश
ठळक मुद्देराष्ट्रीय किक बॉक्सींग स्पर्धा तालकटोरा स्टेडियम दिल्ली येथे १६ ते २० जानेवारी या कालावधीमध्ये पार पडल्या. यामध्ये स्थानिक राजीव गांधी सैनिकी शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून उत्कृष्ट कामगिरी करत यश संपादन केले. या विद्यार्थ्यांची आयर्लंड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.