जळगाव जामोद : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना झालेल्या अटकेच्या निषेधार्थ १६ मार्च रोजी जळगाव शहरात बहुजन विचार मंचच्यावतीने बंद पुकारण्यात आला. बंदला शहरवासीयांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला आणि बंद १00 टक्के यशस्वी करण्यात आला. यानंतर मागणीबाबतचे निवेदन उपविभागीय अधिकार्यांना देण्यात आले. यादरम्यान अतिरिक्त पोलीस कुमक बोलावून शहरात चोख बंदोबस्त ठेवीत कार्यकर्त्यांंंना स्थानबद्ध करण्यात आले होते.याबाबत दिलेल्या निवेदनानुसार, सक्तवसुली संचालनालय (ईडी) ने सूडबुद्धीने छगन भुजबळांना अटक केली. एकप्रकारे हुकुमशाही करीत संपूर्ण भुजबळ कुटुंबीयास वेठीस धरले गेले आहे. या कृतीचा बहुजन विचार मंचाने निषेध नोंदवत १६ मार्च रोजी दुपारी १२ वाजेपर्यंंंंत शहरात बंदचे आवाहन केले होते. बंदमधून अत्यावश्यक सेवा, दवाखाने, शाळा वगळण्यात आल्या. बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दुपारपर्यंंंंत सर्व प्रतिष्ठाने बंद होती. यादरम्यान बहुजन विचार मंचद्वारा राज्यपाल व मुख्यमंत्र्यांना उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत मागण्यांबाबतचे निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आला.
जळगाव जामोद शहरात बंद यशस्वी
By admin | Published: March 17, 2016 2:26 AM