चिखली (जि. बुलडाणा): तालुक्यातील खंडाळा मकरध्वज येथील माजी सैनिकाचा निकामी झालेला पाय तोडण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला होता. परिणामी या माजी सैनिकाला कायमचे अपंगत्व येणार होते. अशावेळी येथील डॉ. दीपक तनपुरे यांनी पुढाकार घेत पाय न तोडता, यशस्वी शस्त्रक्रिया करून या सैनिकाला नवजीवन दिले. त्याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने डॉ. तनपुरे यांचा ६ फेब्रुवारी रोजी सत्कार करण्यात आला. तालुक्यातील खंडाळा मकरध्वज येथील माजी सैनिक अरुण गोविंदराव भवरे यांना गत १९ जानेवारी रोजी अपघात झाला होता. या अपघातात भवरे यांचा उजव्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे नातेवाइकांनी त्यांना प्रारंभी मिल्ट्री हॉस्पिटलमध्ये भरती केले होते. तेथून त्यांना कमान हॉस्पिटल व नोबेल हॉस्पिटल यांसारख्या मोठय़ा हॉस्पिटलमध्ये हलविले. तेथे डॉक्टरांनी भवरे यांचा पाय निकामी झाल्याचे सांगून तो तोडण्याचा सल्ला दिला होता. शस्त्रक्रियेसाठी तब्बल नऊ लाख रुपयांचा खर्चदेखील सांगितला होता. यामुळे भवरे कुटुंबीय पूर्णत: अडचणीत सापडले होते. आधीच आर्थिक परिस्थिती कमकुवत, त्यात तब्बल नऊ लाख रुपये खचरूनही कायमचे अपंगत्व येणार असल्याने कुटुंबातील सदस्य चिंताग्रस्त झाले होते.
निकामी पायावर यशस्वी शस्त्रक्रिया
By admin | Published: February 08, 2016 2:18 AM