दूध विक्रेते, वितरण केंद्र हे सकाळी ६ ते दुपारी ३ आणि सायंकाळी ६ ते रात्री ८.३० पर्यंत सुरू राहतील.
सर्व प्रकारची बिगर जीवनावश्यक दुकाने, आस्थापना बंद राहतील.
प्रतिबंधित क्षेत्रात रात्री ८.३० ते सकाळी ८ वाजेपर्यंत संचारबंदी लागू राहील.
नगरपरिषद, नगरपंचायत क्षेत्रातील ज्या उद्याेगांना सुरू ठेवण्याकरिता यापूर्वी परवानगी देण्यात आलेली आहे, ते सर्व उद्याेग सुरू ठेवण्याकरिता परवानगी राहील.
सर्व प्रकारची शासकीय कार्यालये, बँका १५ टक्के किंवा १५ व्यक्ती यांपैकी जी संख्या जास्त असेल ती ग्राह्य धरून सुरू राहतील.
सर्व प्रकारची उपाहारगृहे, हाॅटेल्स प्रत्यक्ष सुरू न ठेवता फक्त पार्सल सुविधेस परवानगी राहील.
लग्न समारंभासाठी २५ व्यक्तींना उपस्थिती, तहसीलदारांकडून परवानगी घेणे आवश्यक राहील.
अशैक्षिणक कर्मचारी, संशाेधन कर्मचारी, वैज्ञानिक यांना उत्तरपत्रिका तपासणे, निकाल जाहीर करणे व इतर कामांकरिता परवानगी राहील.
मालवाहतूक ही नेहमीप्रमाणे सुरू राहील आणि वाहतुकीसाठी कुठल्याही प्रकारचे निर्बंध राहणार नाहीत.
प्रतिबंधित क्षेत्रातील सर्व प्रकारच्या शाळा, महाविद्यालये, शैक्षिणक प्रशिक्षण केंद्र, खासगी शिकवणीवर्ग बंद राहतील.
संचारबंदीच्या काळात सिनेमागृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, उद्याने, नाट्यगृहे, प्रेक्षकगृहे व इतर संबंधित ठिकाणे बंद राहतील.
धार्मिक स्थळे प्रतिबंधित क्षेत्रामध्ये नागरिकांसाठी पूर्णपणे बंद राहतील.
प्रतिबंधित क्षेत्रात आठवडी बाजार बंद राहतील.