आगामी तीन महिन्यांत कारखान्याचे दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात येऊन या हंगामात तब्बल १ लाख १५ हजार टन ऊसाच्या गाळपाचे उद्दिष्ट समोर असून हा कारखाना पूर्ण क्षमतेने चालणार असल्याचे राधेश्याम चांडक यांनी सांगत ,शेतकऱ्यांना आवश्यक ती मदत देण्याचे आश्वासन यावेळी दिले़ साखर कारखाना हा शेतकरी आणि शेतीला आर्थिक स्थैर्य देणारा ठरावा यासाठी शेतकऱ्यांनी ऊसाची लागवड करावी, यासाठी बुलढाणा अर्बन शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी तयार असल्याचे डॉ. सुकेश झंवर यांनी सांगितले. यावेळी पैनगंगा शुगर मिल्सचे अध्यक्ष समाधान डोईफोडे, शेषराव जायभाये, श्रीमंत डोईफोडे, प्रभाकर ताठे, विनयचंद्र बडे, भगवान खाडे, प्रेमनाथ सानप यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. धाड भागातील देवीदास जाधव, रामदास भोंडे, अल्ताफ समी अ. जब्बार, डॉ. तेजराव नरवाडे, अर्जुन वाघ, समाधान सरोदे, विनोद कानडजे,अमोल पडोळ, उमेश दांडगे, महेंद्र बोर्डे, नंदकिशोर जाधव, रामसिंग पडोळ, प्रकाश राऊत,सुभाष जाधव, राजू धंदर, पद्माकर सरडे, प्रभाकर चव्हाण, गणेश चव्हाण यांच्यासह धाड व भागातील असंख्य शेतकरी या कार्यक्रमास हजर होते. आभारप्रदर्शन समाधान डोईफोडे यांनी व्यक्त केले.
ऊस लागवड वाढणार
धाड येथील साखर कारखाना सुरू हाेणार असल्याने शेतकऱ्यांना त्याचा माेठ्या प्रमाणात लाभ हाेणार आहे़ बागायती क्षेत्र असलेल्या धाड परिसरात ऊसाची लागवड वाढणार आहे़ यातून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन हाेण्याची अपेक्षा आहे़