शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
2
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
3
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
4
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
5
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
6
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
7
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
8
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
9
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
10
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
11
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
12
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
13
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
14
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
15
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
16
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
17
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
18
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
19
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
20
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना

रेशनचे धान्य कमी मिळाल्याने आत्महत्येचा प्रयत्न, स्टॅम्प पेपरवरच 'सुसाईड नोट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2018 19:06 IST

खामगाव: रेशनचे धान्य कमी मिळत असल्याने त्रस्त झालेल्या एका लाभार्थ्याने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना ...

खामगाव: रेशनचे धान्य कमी मिळत असल्याने त्रस्त झालेल्या एका लाभार्थ्याने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना खामगाव तालुक्यातील पळशी बु. येथे शनिवारी सायंकाळी घडली. आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी या इसमाने शंभर रूपयांच्या स्टॅम्प पेपरवरच सुसाईड नोट लिहिली होती. त्यामध्ये रेशन दुकानदारासह तिघांच्या छळाचा उल्लेख केल्याचे उघडकीस आले आहे. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

आधार कार्ड लिंक नसल्यामुळे रेशन धान्य दुकानदाराने धान्य नाकारले. परिणामी, मोताळा तालुक्यात भूकबळी गेल्याचा धक्कादायक प्रकार गेल्याच महिन्यात उघडकीस आला. मेहकर तालुक्यातील एका निराधार आणि वृद्ध महिलेला धान्य नाकारण्यात आल्याचा प्रकार ताजा असतानाच, शनिवारी रेशनचे धान्य कमी मिळत असल्याची तक्रार संबंधित व्यक्तीने केली होती. त्यामुळे, रेशन दुकानदारासह तिघांनी जिवे मारण्याची धमकी दिली. या तिघांचा छळ असह्य झाल्याने खामगाव तालुक्यातील पळशी बु. येथील पांडुरंग शंकर रेवस्कर (40) या लाभार्थ्याने विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. तत्पूर्वी रेशन दुकानदार हसनराव चव्हाण, मालवाटप करणारा विलास खरपकार आणि सहकारी संघरक्षक शंकर ठोसरे यांच्याकडून छळ होत असल्याने, आपण आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे रेवस्कर यांनी लिहून ठेवले आहे. दरम्यान, हा प्रकार उजेडात आल्यानंतर स्वस्त धान्य दुकानदार हसनराव चव्हाण यांनी रविवारी व्हॉटसअपवरून सामाजिक बदमानी केल्याची तक्रार खामगाव ग्रामीण पोलिसात दिली. यात पांडुरंग रेवसकर गुंड प्रवृत्तीचे असल्याचा उल्लेख करून त्यांचा आत्महत्येचा प्रयत्न बनाव असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास खामगाव ग्रामीण पोलीस करीत आहेत. यासंदर्भात अधिक माहितीसाठी स्वस्त धान्य दुकानदार हसनराव देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता, ते उपलब्ध होवू शकले नाहीत. तथापि, चव्हाण यांची तक्रार म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’ असल्याचे रेवस्कर यांच्या नातेवाईकाने नाव न छापण्याच्या अटीवर ‘लोकमत’शी बोलताना सांगितले

व्हॉटसअपवर आत्महत्येचा संदेश!रेशन धान्य दुकानदार चव्हाण, विलास खरपकार, संघरक्षक ठोसरे या तिघांच्या छळामुळे आत्महत्या करीत असल्याचा संदेश व्हॉटसअपवर व्हायरल केला. त्यानंतर सायंकाळी 6 वाजेच्या दरम्यान पांडुरंग रेवस्कर यांनी गावातील स्मशानभूमी नजीक असलेल्या एका शेतात विषारी द्रव्य प्राशन केले. तत्पूर्वी काही जणांना फोनवरूनही माहिती दिली. त्यामुळे नातेवाईकांनी त्यांचा शोध घेऊन रात्री 11 वाजताच्या सुमारास उपचारार्थ अकोला येथील सामान्य रुग्णालयात भरती केले. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे समजते. 

रेवस्कर यांच्या नातेवाईकांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार!

रेशन दुकानदार आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या त्रासामुळे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या रेवस्कर यांच्या नातेवाईकांनी जिल्हा पोलीस अधिक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे रजिस्टर तक्रार केल्याचे समजते. आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी रेवस्कर यांनी लिहून ठेवलेला शंभर रूपयांचा स्टॅम्पपेपरदेखील जिल्हा पोलीस अधिक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे रजिस्टर करण्यात आल्याची माहिती आहे.

यासंदर्भात अद्यापपर्यंत आपणाकडे तक्रार प्राप्त नाही. मात्र, शंभर रुपयांच्या स्टॅम्पपेपरवर धान्य कमी मिळाले. तसेच तिघांच्या छळामुळे आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार आपल्या कानावर आला आहे. तक्रार प्राप्त होताच, तहसीलदारांना पत्र दिले जाईल. संपूर्ण चौकशीअंती पुढील कारवाई केली जाईल.- रफीक शेखपोलिस निरिक्षक, खामगाव-ग्रामीण.

टॅग्स :buldhanaबुलडाणाSuicideआत्महत्या