लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : बुलडाणा शहरापासून जवळच असलेल्या सुंदरखेड परिसरातील बालाजी नगरातील एकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना १३ ऑक्टोबर रोजी दुपारी उघडकीस आली.बुलडाणा शहर पोलीस स्टेशनंतर्गत येत असलेल्या सुंदरखेड परिरातील बालाजी नगरातील नीलेश रमेश सिंगरकर (वय ३0 वर्षे) या इसमाने शुक्रवारी दुपारी आपल्या राहत्या घरातील छताला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. याबाबत मृताचा भाऊ योगेश विजयराव सिंगरकर यांनी दिलेल्या तक्रारीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. नीलेश सिंगरकर यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. याप्रकरणी अधिक तपास बुलडाणा शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी करीत आहेत.
गळफास घेऊन युवकाची आत्महत्या!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 1:15 AM
बुलडाणा शहरापासून जवळच असलेल्या सुंदरखेड परिसरातील बालाजी नगरातील एकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना १३ ऑक्टोबर रोजी दुपारी उघडकीस आली.
ठळक मुद्देआत्महत्येचे कारण गुलदस्त्यात !सुंदरखेड परिसरातील घटना