लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर : बोराखेडी पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या भाडगणी तालुका मलकापूर येथील जगन्नाथ शंकर क्षिरसागर (वय-५१) यांनी शनिवारी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. जगन्नाथ शंकर क्षीरसागर हे शेतकरी असून शनिवारी संध्याकाळी बराच वेळ घरी न आल्यामुळे घरच्यांनी त्यांचा शोध घेतला. गावाशेजारी असलेल्या शेतातील गुरांच्या गोठ्याजवळ ते पडलेले दिसले. त्यांनी विष प्राशन केल्याचे समोर आले. याबाबत ज्ञानेश्वर जगन्नाथ क्षिरसागर यांनी बोराखेडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. तपास बीट अंमलदार प्रल्हाद वानखडे करीत आहेत.
भाडगणी येथील शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 11:02 AM