कालव्याचे काम अर्धवट असल्याने शेतकरी त्रस्त
चिखली : तालुक्यातील मेरा खुर्द गावातून साखरखेर्डाकडे जाणाऱ्या रस्त्यावर खडकपूर्णा प्रकल्पाच्या कालव्याचे खोदकाम करण्यात आले आहे. मात्र, कालव्यासाठी खोदण्यात आलेल्या रस्त्यावरचे काम हे अर्धवट अवस्थेत असल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना व गावकऱ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.
मेरा बु परिसरात डेंग्यसदृश तापाची साथ
बुलडाणा : चिखली तालुक्यातील मेरा बु परिसरात गत काही दिवसांपासून डेंग्यूसदृश तापाची साथ सुरू आहे़ त्यामुळे,ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत़ आराेग्य विभागाने उपाययाेजना करण्याची मागणी हाेत आहे़
जिल्ह्यातील जलाशयांमध्ये झाली वाढ
बुलडाणा : काही दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील जलाशयांमध्ये वाढ झाली आहे़ जिल्ह्यातील जलाशयांमध्ये सरासरी ५६ टक्के जलसाठा आहे़ जिल्ह्यात तीन माेठे, सात मध्यम आणि ८१ लघु असे ९१ प्रकल्प आहेत.
विजेच्या लपंडावाने ग्रामस्थ त्रस्त
किनगाव राजा : परिसरात गत काही दिवसांपासून विजेचा लपंडाव हाेत असल्याने ग्रामस्थ त्रस्त हाेत आहे़ सध्या पाऊस तर कधी कडक उन्ह तापत आहे. त्यातच वीज पुरवठा खंडित हाेत असल्याने सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत़ याकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे़