बुलडाणा: शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हय़ात राबविण्यात येणार्या पथदश्री प्रकल्पांतर्गत बुलडाणा जिल्ह्या तील तणावग्रस्त शेतकर्यांचे सर्वेक्षण ऑक्टोबरमध्येच पूर्ण झाले आहे. जिल्ह्यातील १९ हजार ८00 शे तकरी तणावग्रस्त असल्याचे वास्तव समोर आल्यावरही हा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे धूळ खात आहे. दरम्यान, या वर्षातील पहिल्या चार महिन्यातच ४५ शेतकर्यांनी आत्महत्या केल्या असून, ३0 एप्रिल रोजी पार पडलेल्या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत २१ शेतकरी आत्महत्या मदतीस पात्र ठरल्या आहेत. उर्वरि त प्रस्ताव चौकशीवर असून, त्यांनाही त्वरित मदत मिळणे आवश्यक आहे.अत्यल्प पावसामुळे यावर्षी पुन्हा सर्वत्र दुष्काळाचे सावट आहे. अत्यल्प उत्पादनामुळे शेतकरी पुन्हा कर्जबाजारी झाला आहे. त्यामुळे दर महिन्याला शेतकरी आत्महत्या वाढतच आहेत. शेतकरी आत्महत्याग्रस् त जिल्ह्यांमध्ये प्रशासनाने घोषित केलेल्या विविध उपायांमध्ये शेतकर्यांच्या आर्थिक स्थितीचे सर्वेक्षण करून तणावग्रस्त शेतकर्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यासाठी पथदश्री प्रकल्प राबविण्यात ये त आहे. या प्रकल्पांतर्गत सर्वेक्षण पूर्ण झाले. जिल्ह्यातील १ हजार ४२0 गावांपैकी १३७ उजाड गावे वगळता १ हजार २८३ गावांमध्ये महसूल विभागाने हे सर्वेक्षण केले. यामध्ये १९ हजार ८00 शेतकरी तणावाखाली असल्याचे स्पष्ट होत आहे.
२१ आत्महत्या ठरल्या मदतीस पात्र!
By admin | Published: May 01, 2016 1:27 AM