लोकमत न्यूज नेटवर्कसिंदखेडराजा: स्थानिक बसस्थानकाच्या संरक्षण भिंतीचे बांधकाम करणार्या विजय ओंकार काकडे मिस्त्री (५५) यांनी १२ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.याप्रकरणी मृतकाचा भाऊ विनायक ओंकार काकडे यांनी सिंदखेड राजा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. नेमक्या कोणत्या कारणाने त्यांनी आत्महत्या केली, ही बाब अद्याप स्पष्ट झालेली नाही.मृतक विजय ओंकार काकडे यांना दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. स्थानिक जिजामाता नगरमध्ये ते राहत होते. मंगळवारी दुपारी त्यांनी बसस्थानकाच्या संरक्षण भिंतीचे काम केले. सोबतच स्थानिक काही नागरिकांशीही गप्पा मारल्या; मात्र सायंकाळी पाचच्या सुमारास त्यांनी घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यावेळी घरातील सर्व जण बाहेर गेलेले होते. दरम्यान, त्यांची सून झाडझूड करण्यासाठी घरात गेली असता त्यांनी आत्महत्या केल्याचे दिसले. पोलीस घटनास्थळी पोहोचले.
सिंदखेडराजा येथे बांधकाम मिस्त्रीची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 1:48 AM
सिंदखेडराजा: स्थानिक बसस्थानकाच्या संरक्षण भिंतीचे बांधकाम करणार्या विजय ओंकार काकडे मिस्त्री (५५) यांनी १२ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
ठळक मुद्देविजय ओंकार क ाकडे मिस्त्री असे मृतकाचे नावराहत्या घरी घेतला गळफास; आत्महत्येचे क ारण अस्पष्ट