लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर(जि.बुलडाणा) : तालुक्यातील मौजे म्हैसवाडी येथील एका ४५ वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी २ वाजता उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.याबाबत माहिती अशी, की रमेश राजाराम धाडे (वय ४५) रा. म्हैसवाडी याने शुक्रवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास स्वत:च्या घरातील टिनाखाली बल्लीला दोर बांधून गळफास घेतल्याचे उघडकीस आले. ही बाब परिवारातील लोकांच्या लक्षात आल्याने त्यांनी आरडाओरड केली. त्यांना खाली उतरविण्यात आले; मात्र त्यांची प्राणज्योत मालवली होती. याप्रकरणी दिलीप किसन धाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांनी अप नं. ३/१८ कलम १७४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास एएसआय मोहनसिंग राजपूत करीत आहेत.
म्हैसवाडी येथील इसमाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 1:09 AM
मलकापूर(जि.बुलडाणा) : तालुक्यातील मौजे म्हैसवाडी येथील एका ४५ वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी २ वाजता उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
ठळक मुद्देबल्लीला दोर बांधून गळफास