लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांमधील स्वयंसहाय्यता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर व त्यांच्या उपसाधनांचा पुरवठा करण्यात येणार आहे. यामध्ये साडेतीन लाख रूपयांच्या कमाल मयार्देत मिनी ट्रॅक्टर व त्यांची उपसाधने कल्टीव्हेटर, रोटॅव्हेटर अथवा ट्रेलरचा समावेश असणार आहे. या योजनेद्वारे वस्तू स्वरूपात मिळणाऱ्या लाभांचे हस्तांतरण रोख स्वरूपात लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे.या योजनेच्या लाभाकरीता स्वयंसहाय्यता बचत गटातील किमान ८० टक्के सदस्य अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांमधील असावेत. महाराष्ट्राचे रहिवासी असावेत. बचत गट हा नोंदणीकृत असावा. निवड झालेल्या लाभार्थी बचत गटांना १० टक्के स्व:हिस्सा रक्कम सदर कार्यालयात भरावी लागेल. बचत गटाचे अध्यक्ष व सचिव अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवगार्तील असावे. मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांच्या खरेदीची कमाल मर्यादा साडेतीन लाख रुपये एवढी आहे. या बचत गटांनी त्यावरील कमाल मर्यादेच्या रक्कमेच्या किंवा प्रत्यक्ष साधनांच्या किंमतीच्या १० टक्के स्व:हिस्सा भरल्यानंतर प्रत्यक्ष किमतीच्या ९० टक्के (कमाल ३.१५ लाख) शासकीय अनुदान अनुज्ञेय राहणार आहे.लाभार्थी बचत गटांना अनुज्ञेय असलेल्या किमान ९ ते १८ अश्वशक्तीपेक्षा जादा अश्वशक्तीचे ट्रॅक्टर व त्याची उपसाधने खरेदी करता येतील. मात्र त्याची या योजेनतंर्गत अनुज्ञेय असलेल्या अनुदान ३.१५ लाख रूपयांपेक्षा जास्तीची रक्कम संबधित बचत गटाने स्वत: खर्च करावी. योजनेअंतर्गत लाभार्थी बचत गटाची निवड झाल्यानंतर निधार्रीत केलेल्या प्रमाणकानुसार मान्यताप्राप्त उत्पादकांकडून मिनी ट्रॅक्टर, ट्रॅक्टर व त्याची उपसाधने शासनाने निधार्रीत केलेल्या किंमतीपर्यंत खरेदी करावीत. अनुदानाचा ५० टक्के हप्ता बचत गटाच्या आधार संलग्न खात्यावर जमा करण्यात येणार असून उर्वरित ५० टक्के अनुदान मिनी ट्रॅक्टर, ट्रॅक्टर व त्याची उपसाधने यांची आरटीओ कार्यालयाकडे नोंद झाल्यानंतर बचत गटाच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल. तसेच बचत गटाने साहित्याची आरटीओ कार्यालयाकडे नोंद केल्याचे पुरावे सादर केल्यास १०० टक्के अनुदान बचत गटाच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल.इच्छूक बचत गटांनी विहीत नमुन्यातील अर्ज १२ सप्टेंबर पूर्वी समाजकल्याण सहायक आयुक्त कार्यालयाते कार्यालयात सादर करावे, असे आवाहन समाजकल्याण सहाय्यक आयुक्तांनी केले आहे.
ही लागणार कागदपत्रेया योजनेसाठी बचत गट नोंदणीबाबत सक्षम अधिकाऱ्यांच्या नोंदणी प्रमाणपत्राची साक्षांकित प्रत, बचत गटातील मुळ सदस्यांची यादी, घटना व नियमावली प्रत, बचत गटातील सर्व सदस्यांचे सक्षम अधिकारी यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र, तसेच सक्षम अधिकारी यांनी दिलेले अधिवास प्रमाणपत्र आदी कागदपत्रे अनिवार्य असणार आहेत.