शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
4
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
5
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
6
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
7
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
8
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
9
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
10
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
11
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
12
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
13
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
14
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
15
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
16
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
17
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
18
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
19
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
20
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत

महिलांना सॅनेटरी नॅपकीन यंत्राचा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 2:26 PM

आरोग्य उपकेंद्रामध्ये सुरू केलेल्या या सुविधेमुळे विद्यार्थिनींसह महिलांमधूनही समाधान व्यक्त होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या सॅनेटरी नॅपकीन खरेदीसाठी महिलांना आजही संकोच वाटतो, त्यामुळे तालुक्यातील साखळी बु. ग्रामपंचायतने गावातच सॅनेटरी नॅपकिनचे स्वयंचलीत यंत्र बसविले आहे. आरोग्य उपकेंद्रामध्ये सुरू केलेल्या या सुविधेमुळे विद्यार्थिनींसह महिलांमधूनही समाधान व्यक्त होत आहे.महिला व मुलींचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी तालुक्यातील साखळी बु. या गावातील ग्रामपंचायतीने स्वयंचलीत सॅनेटरी पॅड वेंडिंग मशिन खरेदी केले. हे मशिन ग्रामपंचायत किंवा शाळा याठिकाणी ठेवल्यास त्याचा वापर करतांना महिला समोर येणार नाहीत. त्यामुळे गावातील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामध्ये हे स्वयंचलीत यंत्र बसविण्यात आले आहे. त्यामुळे महिला व विद्यार्थीनींना आरोग्याच्या दृष्टीने सॅनेटरी नॅपकिनच्या स्वयंचलीत यंत्राचा मोठा फायदा होणार आहे.

सॅनेटरी नॅपकीन विषयही आजही पाहिजे त्या प्रमाणात जागृती झालेली नसल्याने महिला सॅनेटरी नॅपकीनच्या खरेदीसाठी संकोच बाळगतात. परंतू आरोग्यासाठी हे महत्त्वाचे आहे. त्यामुळे साखळी बु. ग्रामपंचायतने आरोग्य उपकेंद्रामध्ये सॅनेटरी नॅपकीन यंत्राची सुविधा सुरू केली आहे. अशी सुविधा प्रत्येक गावात होणे आवश्यक आहे.- विजया कोळसे, सरपंच, साखळी बु.

महिलांनी केले पूजनसाखळी बु. प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामध्ये सॅनेटरी नॅपकिनचे स्वयंचलीत यंत्र बसविल्यानंतर सरपंच विजया अनिल कोळसे यांच्यासह महिलांनी यंत्राचे पूजन करण्यात आले. यावेळी ग्रामपंचात सदस्या द्वारकाताई खंडारे, मंगला सोनुने, कासाबाई लहासे, ज्योती चाटे, शमनुरबी ईस्माईल खान, सुमन सोरोशे, ललिता सोनुने, संगीता सोनुने, आशा वर्कर्स योगिता डांगे, नलिनी गोरे, रेखा सायसुंदर, चंदाबाई सोनुने, दुर्गाबाई सुरडकर, अंगणवाडी सेविका मनोरमा साखळीकर, वरदाळे व विद्यार्थीनींची उपस्थिती होती.

टॅग्स :buldhanaबुलडाणा