शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
4
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
5
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
6
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
7
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
8
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
9
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
10
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
11
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
12
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
13
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
14
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
15
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
16
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
17
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
18
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
19
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
20
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य

सानंदा, नावंदर यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 1:07 AM

खामगाव : येथील बहुचर्चित नगर परिषद इमारत बांधकामासाठी आर्किटेक्ट नेमणूक गैरव्यवहार प्रकरणात माजी आमदार दिलीप सानंदा, अनिल नावंदरसह इतर आरोपींनी दाखल केलेली याचिका बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.  

ठळक मुद्देनगर परिषद इमारत आर्किटेक्ट नेमणूक गैरव्यवहार प्रकरण‘त्या’ १0 लाखांच्या दंडाबाबत शासनाने निर्णय घ्यावा!

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव : येथील बहुचर्चित नगर परिषद इमारत बांधकामासाठी आर्किटेक्ट नेमणूक गैरव्यवहार प्रकरणात माजी आमदार दिलीप सानंदा, अनिल नावंदरसह इतर आरोपींनी दाखल केलेली याचिका बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.  खामगाव नगरपालिकेच्या नवीन इमारत बांधकामाच्यावेळी आर्किटेक्ट नियुक्तीत गैरव्यवहार झाल्याबाबत नगरसेवक संदीप वर्मा यांनी खामगाव न्यायालयात फौजदारी प्रकरण दाखल केले होते. नंतर रिव्हिजन याचिकाही खामगाव सत्र न्यायालयात दाखल करण्यात आली होती. यावरून न्यायालयाने शहर पोलिसांना या प्रकरणी एफआयआर दाखल करून घेत, गुन्हे नोंदवून पुढील कारवाई करण्याचा आदेश दिला होता. या आदेशावरून पोलिसांनी या प्रकरणी माजी आ. दिलीप सानंदा, तत्कालीन नगराध्यक्ष अशोक सानंदा, अनिल नावंदर, सरस्वती खासणे, दिनेश अग्रवाल यांच्यासह नऊ जणांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. दरम्यान, अनिल नावंदरसह इतरांनी सदर प्रकरण चालविण्याचे सेशन कोर्टाला अधिकार नसल्याबाबत याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. तसेच माजी आ. दिलीपकुमार सानंदा यांना खामगाव सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन नाकारल्याने त्यांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. या दोन्ही प्रकरणाची सुनावणी करताना, २१ डिसेंबर २0१५ रोजी उच्च न्यायालयाने सानंदांचा अटकपूर्व जामीन अर्ज नामंजूर करत, त्यांना पोलिसांसमोर आत्मसर्मपण करण्याचा आदेश दिला होता. तसेच नावंदर व इतर आरोपींनी दाखल केलेले प्रकरण रद्द करण्यासंबंधीची याचिका फेटाळून लावली होती. याला आव्हान देत आरोपींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेऊन त्यांच्याविरुद्ध चुकीच्या पद्धतीने गुन्हे दाखल झालेले असून, सदर गुन्हे खारीज करत प्रकरण रद्द करावे, अशी मागणी सर्वोच्च न्यायालयाकडे केली होती. दरम्यान, बुधवार, ९ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती कुरियन जोसेफ व आर. बानुमती यांच्या द्विसदस्यीय खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने सानंदा, नावंदरसह इतर आरोपींची याचिका फेटाळून लावली.  यासंदर्भात काँग्रेस नेते अनिल नावंदर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

‘त्या’ १0 लाखांच्या दंडाबाबत शासनाने निर्णय घ्यावा!अवैध सावकारी प्रकरणात हस्तक्षेप केल्याने सानंदांमुळे राज्य शासनाला भरावे लागलेल्या १0 लाख रुपयांच्या दंडाची रक्कम शासनाने सानंदांकडून वसूल करावी, असा आदेश उच्च न्यायालयाने २१ डिसेंबर २0१५ रोजी सुनावणीदरम्यान दिला होता. या दंडाच्या रकमेबाबत काय करायचे, याचा निर्णय राज्य सरकारने घ्यावा, असा आदेश बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आमच्या बाजूने निर्णय दिला आहे. सर्वच आरोपींना अटकेपासून संरक्षण मिळाले असून, या प्रकरणात पोलीस चार्जशिट दाखल करणार असतील, तर तोपर्यंंत आरोपींना अटक करण्यात येऊ नये, असे कोर्टाने म्हटले आहे. त्यामुळे हा निकाल ७५ टक्के आमच्या बाजूने असून, सत्याचा विजय झाला आहे; परंतु राजकीय विरोधकांनी याबाबत नेहमीप्रमाणे दिशाभूल करण्याचे धोरण अवलंबलेले दिसते.-दिलीपकुमार सानंदा, माजी आमदार, खामगाव