- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: जलंब येथील सुरभी येथील महिला बचत गटाच्यावतीने यंदाच्या दिवाळीत ‘गोधन दिवाळी’ हा उपक्रम हाती घेतला आहे. त्याअंतर्गत स्थानिक महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देत, दुर्लक्षित झालेल्या गायीच्या शेणाला प्रतिकिलो १०० रुपयांपर्यंत किंमत मिळावी या उद्देशाने २५ हजार गोमय पणत्याच्या विक्रीचा संकल्प केला आहे. दीपावलीत गोधनाचे पूजन केले जाते. गोमातेला जेवढे महत्व आहे. तितकेच महत्व आरोग्यदायी शेणालाही आहे. त्यामुळे याचा धागा पकडून शेणापासून दिपक (दिवे) निर्मितीला गत २ महिन्यापासून सुरवात केली आहे. या बचत गटातील महिलांनी कल्पकतेतून आतापर्यंत जवळपास १० हजार दिवे तयार केले आहे. महिला बचत गटातील महिलांना रोजगार आणि गोमय दीवे तयार करण्याचे प्रशिक्षण देणारा सुरभी हा जिल्ह्यातील ऐकमेव बचत गट आहे.
‘गोमय वसते लक्षमी’ या उक्ती ला सार्थक ठरवीत जलंब येथील सुरभी बचत गटाने आतापर्यंत मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर, लातूर दिल्ली, जयपूर, सुरत, बेंगलोर येथे १५००० दिव्याची विक्री केली. जिल्ह्यात खामगाव व अन्य ठिकाणी ही गोमय दीवे उपलब्ध आहे.
जिल्ह्यातील महिला बचत गटांना गोमय पणत्या व अन्य उत्पादने बनविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. महिला बचत गटाच्या माध्यमातून २५ हजार दिव्यांची निर्मिती केल आहे. ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक हातभार लावण्यासाठी गोमय दिवे विकत घ्यावे.
- योगिता नेरकर सुरभी महिला बचत गट, जलंब