मेहकर तालुक्यात पेनटाकळी मध्यम प्रकल्प आहे. काही काम अपूर्ण आहे. मात्र त्याचा फटका २०१२ पासून पेनटाकळी, कळमेश्वर, दुधा, रायपूर, ब्रम्हपुरीसह काही गावांना बसत आहे. प्रकल्पाच्या कालव्यातून पाझरणाऱ्या पाण्यामुळे खरीप, रब्बी व उन्हाळी पिकांचे नुकसान होते. २०१२ पासून हे शेतकरी त्रस्त आहेत. प्रकल्प बांधकाम विभाग व सिंचन विभाग २०१२ पासून जाणीवपूर्वक या गंभीर समस्येवर ठोस उपाययोजना करत नाही. शेतकरी शासनाला सर्व सहकार्य करतात. तरी सुद्धा त्यांना दरवर्षी या समस्या भेडसावत आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून आपण विधानसभा अधिवेशनात तसेच प्रत्यक्षात मंत्री जयंत पाटील व तत्कालीन संबंधित मंत्री यांना भेट घेतल्याची माहिती संजय रायमुलकर यांनी दिली. चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवून घेतली. मात्र प्रकल्प बांधकाम विभाग व सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांना याचे काहीच वाटत नाही. विशेष म्हणजे २ मे रोजी बुलडाणा येथे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, खा. प्रतापराव जाधव, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्या बैठकीत खा. प्रतापराव जाधव यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते की २०१२ पासून ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पाझरणाऱ्या पाण्यामुळे नुकसान झाले आहे त्यात मदत दिलेले वर्ष वगळून उर्वरित सर्व नुकसानाचे अहवाल एकत्र करून शासनाला पाठवा. मात्र अद्यापपर्यंत सर्व्हे कोण करणार यातच बांधकाम व सिंचन विभागात एकमत झाले नाही. त्यामुळे १५ जूनपर्यंत सर्व्हे न झाल्यास २१ जूनपासून पेनटाकळी प्रकल्पात शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा आ. संजय रायमुलकर यांनी दिला आहे. पेनटाकळी प्रकल्पात बसून आंदोलन करण्याचा इशारा
-------------डबलबातमी--------------------------------------------------------------------------------
मेहकर : तालुक्यातील पेनटाकळी मध्यम प्रकल्पाच्या पाझरणाऱ्या पाण्यामुळे २०१२ पासून तालुक्यातील काही गावातील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे. त्यांना तत्काळ सर्व्हे करून मदत देण्यासाठी अहवाल १५ जूनपर्यंत पूर्ण न केल्यास अन्यायग्रस्त शेतकऱ्यांसाठी २१ जून पासून पेनटाकळी प्रकल्पात बसून आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना आमदार संजय रायमुलकर यांनी दिला आहे.
मेहकर तालुक्यात पेनटाकळी मध्यम प्रकल्प आहे. काही काम अपूर्ण आहे. मात्र त्याचा फटका २०१२ पासून पेनटाकळी, कळमेश्वर, दुधा, रायपूर, ब्रम्हपुरीसह काही गावांना बसत आहे. प्रकल्पाच्या कालव्यातून पाझरणाऱ्या पाण्यामुळे खरीप, रब्बी व उन्हाळी पिकांचे नुकसान होते. २०१२ पासून हे शेतकरी त्रस्त आहेत. प्रकल्प बांधकाम विभाग व सिंचन विभाग २०१२ पासून जाणीवपूर्वक या गंभीर समस्येवर ठोस उपाययोजना करत नाही. शेतकरी शासनाला सर्व सहकार्य करतात. तरी सुद्धा त्यांना दरवर्षी या समस्या भेडसावत आहेत. लोकप्रतिनिधी म्हणून आपण विधानसभा अधिवेशनात तसेच प्रत्यक्षात मंत्री जयंत पाटील व तत्कालीन संबंधित मंत्री यांना भेट घेतल्याची माहिती संजय रायमुलकर यांनी दिली. चतुर्थ सुधारित प्रशासकीय मान्यता मिळवून घेतली. मात्र प्रकल्प बांधकाम विभाग व सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांना याचे काहीच वाटत नाही. विशेष म्हणजे २ मे रोजी बुलडाणा येथे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, खा. प्रतापराव जाधव, जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांच्या बैठकीत खा. प्रतापराव जाधव यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते की २०१२ पासून ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पाझरणाऱ्या पाण्यामुळे नुकसान झाले आहे त्यात मदत दिलेले वर्ष वगळून उर्वरित सर्व नुकसानाचे अहवाल एकत्र करून शासनाला पाठवा. मात्र अद्यापपर्यंत सर्व्हे कोण करणार यातच बांधकाम व सिंचन विभागात एकमत झाले नाही. त्यामुळे १५ जूनपर्यंत सर्व्हे न झाल्यास २१ जूनपासून पेनटाकळी प्रकल्पात शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन करणार असल्याचा इशारा आ. संजय रायमुलकर यांनी दिला आहे.