--नुकसानीची व्याप्ती मोठी--
प्राथमिक स्तरावर १३२५ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असले तरी ८ सप्टेंबर रोजी पूर अेासरल्यानंतर पावसाने झालेल्या नुकसानाचे वास्तव समोर येत आहे. मोताळा तालुक्यात तर शेतात उभी असलेली पिके जमीनदोस्त झाली आहेत. मोताळा तालुक्यात मातीचे काही छोटे बंधारे फुटल्यामुळेही शेतकऱ्यांची जमीनही खरडून गेली असल्याचे समोर येत आहे.
--जून, जुलैमध्येही नुकसान--
जून, जुलै महिन्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला असला तरी यादरम्यान काही ठिकाणी झालेल्या पावसामुळे चिखली, मोताळा, खामगाव, मेहकर आणि लोणार तालुक्यातही मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी पाच तालुक्यांतील ३ हजार ९९२ शेतकऱ्यांचे १ हजार ५७४ हेक्टरवरील शेतपिकांचे नुकसान झाले होते. चिखली तालुक्यात ७३५.७९ हेक्टर, मोताळा २.६८, खामगाव ३१५.५०, मेहकर १११.५५ आणि लोणार तालुक्यात ४०८.२० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. काही प्रमाणात सिंदखेड राजा तालुक्यातही नुकसान झाले.
--पावासाने तूट भरून काढली--
या पावसामुळे जिल्ह्याची १५ टक्के तूटही भरून निघाली आहे. सध्या वार्षिक सरासरीच्या तुलनेत आतापर्यंत जिल्ह्यात ७६.९६ टक्के पाऊस झाला असून, गेल्यावर्षी ७७.७७ टक्के पाऊस ८ ऑगस्टपर्यंत झाला होता. त्यातच सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे पाऊस राहिलेली थोडीफार तूटही भरून काढण्याची शक्यता आहे.