शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

आपुले मरण पाहिले म्या डोळा; बचावलेल्या महिलेने अनुभवला थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 17:01 IST

Khamgaon News : इमारत कोसळल्यानंतर परिसरातील युवकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत तिला बाहेर काढले.

 - अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: ‘मृत्यू’ अटळ असला तरी जोपर्यंत तो समोर दिसत नाही तोपर्यंत तो जाणवतही नाही. मात्र, एकदा का तो समारे ठाकला आणि क्षणाक्षणाने जवळ येऊ लागला की, थोरा मोठ्यांची भंबेरी उडते.... दैव बलवत्तर  असले की प्राण पाखराचा बचाव होतो आणि विपरित परिस्थितीतही सर्वकाही सुरळीत होते...असाच प्रत्यय शुक्रवारी खामगावातील एका वयोवृध्द महिलेला आला. शिकस्त इमारत कोसळल्यानंतर परिसरातील युवकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत तिला बाहेर काढले. सुखरूप बाहेर पडल्यानंतर ‘आपुले मरण पाहिले म्या डोळा’ असेच शब्द त्या महिलेच्या ओठी उमटले.- शुक्रवारी दुपारी साडे अकरा वाजताची वेळ... घरातील महिलांची चिल्या-पिल्यांना दोन घास भरविण्याची लगबग सुरू असतानाच, शिकस्त इमारतीच्या काही विटा आणि मलबा पडल्याचे निर्दशनास येते. घरातील प्रत्येकाची बाहेर पडण्यासाठी लगबग सुरू होते. वृध्द म्हातारी, चिमुकले आणि एक गृहीणी बाहेर पडताच. ठराविक अंतराने इमारतीचा काही भाग क्षणार्धात कोसळतो. घरात साहित्याची शोधाशोध करीत असलेली महिला अचानक संकटात सापडते. पडण्यापासून बचावलेल्या एका कोपºयाचा आसरा घेत  ती तिथेच थांबते. इतक्यात परिसरातील देवदूत मदतीला धावतात आणि संकटात सापडलेल्या महिलेला सुखरूप बाहेर काढतात.सिनेमाच्या कथानकाला साजेशी एक घटना शुक्रवारी शारदाबाई प्रकाश चव्हाण(६३) यांच्यासोबत घडली. शिकस्त इमारत कोसळल्यानंतर केवळ दैव बलवत्तर म्हणून शारदाबाई चव्हाण यांचे प्राण वाचले. अन्यथा, शारदाबाईच्या बाबतीत विपरीत घडले असते. अशी चर्चा आता परिसरात होऊ लागली आहे. दरम्यान, याच घडनेत चव्हाण यांचे शेजारी असलेल्या मधुसुदन चुडीवाले यांच्या मालकीच्या एमएच २८ एआर ७२३९ या दुचाकीचा अक्षरक्ष: चुराडा झाला. त्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.

 परिवार बालंबाल बचावला!वेळीच प्रसंगवधान राखून शिकस्त घरातून शुभांगी जितेंद्र चव्हाण, भक्ती जितेंद्र चव्हाण(६), आरोही जितेंद्र चव्हाण (३), सरस्वतीबाई जीवनलाल चव्हाण घराबाहेर पडल्या. त्यामुळे संपूर्ण परिवार बालंबाल बचावल्याची चर्चा आहे. तर जितेंद्र चव्हाण हे कामावर गेलेले असल्याने   पुढील अनर्थ टळला.

टॅग्स :khamgaonखामगावBuilding Collapseइमारत दुर्घटना